रणबीर कपूर नव्या घराला देणार 'या' खास व्यक्तीचं नाव, बंगल्याची किंमत वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:57 AM2024-03-28T10:57:39+5:302024-03-28T10:58:03+5:30

बांद्रा स्थित कृष्ण राज बंगला बांधून पूर्ण होत आला आहे. वर्षभरापासून सुरु असेलेलं कंस्ट्रक्शनचं काम बघण्यासाठी रणबीर अनेकदा नीतू आणि आलियासह साईटवर जातो.

Ranbir Kapoor will give Raha s name to his new bunglow in mumbai talks going viral | रणबीर कपूर नव्या घराला देणार 'या' खास व्यक्तीचं नाव, बंगल्याची किंमत वाचून बसेल धक्का

रणबीर कपूर नव्या घराला देणार 'या' खास व्यक्तीचं नाव, बंगल्याची किंमत वाचून बसेल धक्का

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लेकीच्या जन्मामुळे खूपच खूश आहे. कित्येक ठिकाणी लाडक्या राहाला कडेवर घेत तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राहा सुद्धा बाबांच्या कुशीत एकदम क्युट दिसते. लवकरच कपूर कुटुंब त्यांच्या 'ड्रीम होम'मध्ये प्रवेश करणार आहेत. बांद्रा स्थित कृष्ण राज बंगला बांधून पूर्ण होत आला आहे. वर्षभरापासून सुरु असेलेलं कंस्ट्रक्शनचं काम बघण्यासाठी रणबीर अनेकदा नीतू आणि आलियासह साईटवर जातो. काल पुन्हा या तिघांना तिथे पाहणी केली. 

सुरुवातीला बंगल्याचं नाव दिवंगत अभिनेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या नावाने ठेवण्यात आलं. त्यानंतर कपूर घराण्याचा एकुलता एक नातू म्हणून प्रॉपर्टी रणबीरच्या नावावर झाली. बंगल्याचं काम कसं सुरु आहे हे पाहण्यासाठी रणबीर आई आणि पत्नीसह पोहोचला. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर दोघंही त्यांची कमाईतील बराच भाग या घरासाठी गुंतवत आहेत. आपलं ड्रीम हाऊस मनासारखं पूर्ण करत आहेत. घरासाठी एकूण 250 कोटी खर्च आला आहे.हे तर शाहरुखच्या 'मन्नत' आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यापेक्षाही महागडा आहे. इतकंच नाही तर लाडकी लेक राहावर जीव ओवाळून टाकणारा रणबीर तिचं नाव बंगल्याला देऊ शकतो. तसंच तिच्या नावावर हा बंगला होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राहा सर्वात श्रीमंत स्टारकिड होऊ शकते.

राहा कपूर आता दीड वर्षांची आहे. तिच्या क्युटनेस सर्वांचंच लक्ष वेधलंय. गेल्या वर्षी ख्रिसमसला रणबीर-आलियाने तिला पहिल्यांदाच माध्यमांसमोर आणलं. तिच्या निळ्या डोळ्यांनी तर सर्वांवरच भुरळ घातली. राहा नेमकी कोणासारखी दिसते यावरुनही चर्चा सुरु झाली होती.

Web Title: Ranbir Kapoor will give Raha s name to his new bunglow in mumbai talks going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.