लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:09 IST2025-08-26T16:09:02+5:302025-08-26T16:09:48+5:30
रणबीर कपूर आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान प्रवासात नेमकं काय घडलं?

लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?
रणबीर कपूर आणि विकी कौशल हे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही एकमेकांचे चांगले मित्र. दोघेही अभिनेते सध्या त्यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून मुंबईला परत येत असताना इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले. ज्यामुळे त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अचानक आपल्यासोबत रणबीर - विकी प्रवास करत आहेत, हे पाहून बसलेल्या प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. काय घडलं नेमकं?
रणबीर-विकीचा व्हिडीओ व्हायरल
रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल नुकतंच राजस्थानमध्ये पूर्ण झालं आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. त्यावेळी विकी आणि रणबीर हे एकाच वेळी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत असताना दिसले, ज्यामुळे त्यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. काही प्रवाशांनी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ते सामान्य प्रवाशांसोबत बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एका एअरलाईन क्रू मेंबरने त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
Vicky Kaushal & Ranbir kapoor😍😍#Vickykaushal#RanbirKapoorpic.twitter.com/dziXT0XNXq
— NARESH (@naresh__off_) August 25, 2025
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर विकी आणि रणबीर या सेलिब्रिटींच्या साधेपणाची चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी म्हटले आहे की, ‘इतके मोठे स्टार असूनही ते सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करत आहेत, हे खूप चांगले आहे.’ दरम्यान विकी-रणबीर-आलिया यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची खूप चर्चा आहे. संजय लीला भन्साली या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून आलिया-विकी-रणबीर प्रथमच यानिमित्त एकत्र काम करत आहेत. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.