"वाट लागेल, हे सगळं बिल्डिंगमध्ये अलाऊड नाहीये..." वाढदिवशीच पापाराझींवर भडकला रणबीर, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:34 IST2025-09-29T14:26:17+5:302025-09-29T14:34:51+5:30
वाढदिवशीच पापाराझींवर रणबीर भडकला, नेमकं काय घडलं?

"वाट लागेल, हे सगळं बिल्डिंगमध्ये अलाऊड नाहीये..." वाढदिवशीच पापाराझींवर भडकला रणबीर, VIDEO व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने काल (रविवार, २८ सप्टेंबर) त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीतून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. वाढदिवसानिमित्त पापाराझीही त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी त्याच्या घराबाहेर जमले होते, पण याचवेळी रणबीर कपूर पाराझींवर भडकला आणि त्याने सगळ्या पापाराझींना गेटच्या बाहेर काढलं. रणबीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रणबीरला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी त्याच्या घराच्या इमारतीच्या गेटजवळ आले, ज्यामुळे अभिनेत्याचा पारा चढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर पापाराझींना इमारतीबाहेर हाकलून लावताना दिसतो. त्याने नाराजी व्यक्त करत म्हटले, "बिल्डिंगवाले तक्रार करतील. तुम्ही बिल्डिंगमध्ये येऊ शकत नाही". तरीही पापाराझींनी त्याचे फोटो घेण्याची मागणी सुरूच ठेवली. "वाट लागेल... अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये", असे त्यानं पापाराझींना म्हटलं. पण, अखेर पापाराझींचा हट्ट पाहता रणबीरनं त्यांच्यासोबत केक कापला.
रणबीरने आपला वाढदिवस पत्नी आलिया भट आणि मुलगी राहा सोबत खास पद्धतीने साजरा केला. रणबीर कपूरचा लाइफस्टाइल ब्रँड आर्कच्या इन्स्टाग्राम पेजवर लाइव्हमध्ये अभिनेत्यानं हेदेखील उघड केले की राहाने त्याला त्याच्या वाढदिवशी काय गिफ्ट दिले. रणबीर कपूर म्हणाला, “मी संपूर्ण दिवस आलिया आणि राहाबरोबर घालवला आहे. राहाने मला वचन दिले होते की ती मला माझ्या वाढदिवशी ४३ किसेस देईल. तर मला ते मिळाले आहे. तिने माझ्यासाठी कार्डदेखील बनवले आहे