रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:26 IST2025-10-01T14:26:18+5:302025-10-01T14:26:54+5:30
रणबीर कपूर-रणवीर सिंह यांच्यात कोल्ड वॉर?

रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा
रणबीर कपूर आणि रणवीर सिंह दोघंही बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते. दोघांची काम करण्याची पद्धत, स्टाईल वेगळी आहे. त्यांनी आपापलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रणबीर कपूरनेसंजय लीला भन्साळींच्या 'सावरिया' मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तर रणवीर सिंहला भन्साळींच्या 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या तीन सिनेमांनी कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. तर आता भन्साळींच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित 'बैजू बावरा' सिनेमात रणबीर कपूर रणवीर सिंहला रिप्लेस करत असल्याची चर्चा आहे.
रणबीर कपूरने नुकताच ४३ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशीच त्याला सरप्राईज मिळालं. डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार, भन्साळींनी रणबीरला एका नवीन प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. सिनेमाचं शूट पुढील वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. भन्साळींच्या टीमने प्री प्रोडक्शन वर्क आधीच सुरु केलं आहे. रणबीर कपूर जुन्या संगीताचा चाहता आहेच. १९५२ सालचा 'बैजू बावरा' या सिनेमातली गाणीही त्याची आवडीची आहेत. तो लेक राहालाही जुनी, टाईमलेस गाणी ऐकवत असतो. हा सिनेमा सुरुवातीला रणवीर सिंहला घेऊन बनवण्याचा भन्साळींचा विचार होता. रणवीरने या सिनेमासाठी तयारीही सुरु केली होती. मात्र भन्साळींनी नंतर लव्ह अँड वॉर सिनेमावर लक्ष द्यायचं ठरवलं. ज्यात रणबीरच आहे. 'बैजू बावरा'बद्दल अनेक रिपोर्ट्स आले ज्यात रणवीर सिंह आणि आलिया भट असतील अशीही चर्चा झाली. मात्र सिनेमाच्या कास्टची अधिकृत घोषणा कधीच झाली नव्हती."
संजय लीला भन्साळींना गेल्या दोन दशकांपासून 'बैजू बावरा' सिनेमा बनवायची इच्छा आहे. रणवीर सिंहसोबत बराच काळ त्यांनी चर्चाही केली. सिनेमाच्या बजेटचा प्रश्न होता मात्र रणवीरला स्क्रिप्ट खूप आवडली होती त्यामुळे त्याने कथेलाच प्राधान्य दिलं होतं. दरम्यान आता रणवीरच्या जागी रणबीरची एन्ट्री होत असल्याने सर्वांना धक्काच बसला आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.