पडद्यावरुन 2 वर्षांपासून गायब आहे रणबीर कपूर, लवकरच सुरु करणार नव्या सिनेमांची शूटिंग
By गीतांजली | Updated: December 19, 2020 17:00 IST2020-12-19T17:00:00+5:302020-12-19T17:00:01+5:30
रणबीर अखेर 2 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसला होता.

पडद्यावरुन 2 वर्षांपासून गायब आहे रणबीर कपूर, लवकरच सुरु करणार नव्या सिनेमांची शूटिंग
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणबीर कपूर पुन्हा एकदा दमदार पद्धतीने काम करण्यास तयार आहे. रणबीर अखेर 2 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसला होता. त्यानंतर रणबीर कपूर आगामी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ चित्रपटाचे शूटिंग करतो आहे, परंतु एकाही सिनेमा रिलीज झालेला नाही. आता रणबीर नव्या वर्षात दोन नवीन सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार रणबीर आधी 7 दिवसांचे 'शमशेर'चे शूटिंग पूर्ण करेल. त्यानंतर तो मुंबईत 'ब्रह्मास्त्र'चे 10 दिवसांचे शूटिंग पूर्ण करेल. जानेवारीपासून रणबीर त्याच्या नव्या रोमँटिक-कॉमेडी सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे, ज्याचे दिग्दर्शन लव्ह रंजन करणार आहेत. या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत रणबीरसोबत असून गाझियाबाद, दिल्ली आणि नोएडा मधील लोकेशन्समध्ये शूटिंग करण्यात येणार आहे.
रिपोर्टनुसार, रणबीर 6 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत एक छोटे शेड्यूल असेल. यानंतर रणबीर 'ब्रह्मास्त्र'साठी 2 गाणी आणि काही सीन्स शूट करणार आहे. 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रणबीर लव्ह रंजनच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल, त्यातील मोठ्या भागाचे शूट परदेशात होणार आहे. लव रंजन यांच्या सिनेमाच्या शूटिंग सतत सुरू राहणार असून मे 2021 पर्यंत पूर्ण होईल.
असं सांगण्यात येत आहे की, सतत सिनेमाच्या शूटिंगमुळे रणबीर खूप नाराज आहे. आता त्याने आपल्या कॉन्ट्रैक्टमध्ये एक क्लॉज जोडला आहे त्यानुसार जर सिनेमाचे शूटिंग वेळेवर पूर्ण झाले नाही तर तो जास्त मानधन घेणार. लव्ह रंजन यांच्या सिनेमाशिवाय रणबीर संदीप रेड्डी वांगा यांच्या गँगस्टर ड्रामा सिनेमात काम करू शकतो. या सिनेमाचे नाव 'डेव्हिल' म्हणून नोंदविण्यात आले होते परंतु आता त्यास 'अॅनिमल' असे नाव देण्यात आले आहे.
रणबीर कपूरची संजय लीला भन्साळींशी 'बैजू बावरा' या पीरियड ड्रामा सिनेमावर चर्चा आहे. अशी बातमी आहे की रणबीरसोबत यात आलियाला कास्ट केले जाऊ शकते.