'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला पाहून प्रेक्षकांना झाली संजय दत्तची आठवण, हॅशटॅग होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 04:25 PM2023-11-24T16:25:44+5:302023-11-24T16:26:14+5:30

Animal : 'अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, हॅशटॅग संजय दत्त X वर ट्रेंड करू लागला. काही नेटकऱ्यांनी रणबीरचा लूक २०१८ साली रिलीज झालेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू या चित्रपटाशी मिळत्याजुळत्या असल्याचे बोलले जात आहे.

RANBIR KAPOOR LOOKS LIKE SANJAY DUTT IN ANIMAL TRAILER SEE NETIZENS REACTION | 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला पाहून प्रेक्षकांना झाली संजय दत्तची आठवण, हॅशटॅग होतोय ट्रेंड

'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला पाहून प्रेक्षकांना झाली संजय दत्तची आठवण, हॅशटॅग होतोय ट्रेंड

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'(Animal Movie)चा ट्रेलर अलिकडेच रिलीज झाला. ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ट्रेलरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते रणबीर कपूरच्या लूकने. चित्रपटात रणबीरचा लूक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत मिळताजुळता आहे. आता एक्सवर संजय दत्तचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

'अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, हॅशटॅग संजय दत्त X वर ट्रेंड करू लागला. काही नेटिझन्सनी रणबीरचा लूक २०१८च्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू या चित्रपटाशी मिळत्याजुळत्या असल्याचे बोलले जात आहे. तर काहींनी त्याची तुलना तरुण संजय दत्तशी केली. एका नेटकऱ्याने रणबीर कपूरचा अॅनिमलमधला लूक शेअर करत लिहिले, 'मला अजूनही रणबीर कपूरमध्ये संजय दत्त दिसतो आहे?' तर एकाने लिहिले की, 'संजय दत्त. या चित्रपटात रणबीर कपूर संजयसारखा दिसत आहे.

संजय दत्तच्या यंग लूकवर चर्चा करताना एका यूजरने लिहिले की, 'जेव्हा मी पहिल्यांदा रणबीरला इथे पाहिले तेव्हा तो संजय दत्तसारखा दिसत होता. इथे संजय दत्त व्यतिरिक्त वास्तवचा संजय दत्त आणि त्या काळात बनवलेले इतर गँगस्टर ड्रामा चित्रपटातला संजय दत्त आहे.रणबीर कपूर विश्वरूपम.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दल... 
'अ‍ॅनिमल' हा पिता-पुत्राचा बंध दाखवणारा चित्रपट आहे. यात अनिल कपूर आणि रणबीर कपूर बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: RANBIR KAPOOR LOOKS LIKE SANJAY DUTT IN ANIMAL TRAILER SEE NETIZENS REACTION

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.