संजय लीला भन्साळींमुळे रणबीर कपूर अडचणीत! 'लव्ह अँड वॉर'चं शूट सुरुच; 'रामायण'वर परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:11 IST2025-12-30T12:11:01+5:302025-12-30T12:11:59+5:30
'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण'च्या रिलीज डेटवरुन रणबीर हैराण

संजय लीला भन्साळींमुळे रणबीर कपूर अडचणीत! 'लव्ह अँड वॉर'चं शूट सुरुच; 'रामायण'वर परिणाम?
अभिनेता रणबीर कपूरसाठी येणारं २०२६ हे वर्ष खास असणार आहे. त्याचे दोन मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' आणि नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या दोन्ही बिग बजेट सिनेमांमध्ये रणबीर मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' रणबीर कपूरसाठी अडचणीचा ठरणार आहे. याचं कारण 'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण' दोन्ही सिनेमांच्या रिलीज डेटमध्ये जास्त दिवसांचं अंतर असणार नाही असं चित्र आहे.
संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट यांची भूमिका आहे. बऱ्याच महिन्यांपासून सिनेमाचं शूट सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार,या सिनेमाचं शूट मे २०२६ पर्यंत लांबलं आहे. त्यामुळे जूनमध्ये सिनेमा रिलीज होणार होता मात्र आता ते शक्य दिसत नाहीये. आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सिनेमा रिलीज होईल अशी शक्यता आहे. मात्र याचा 'रामायण' सिनेमावर परिणाम होणार आहे.
'लव्ह अँड वॉर'चं शूट लांबव्याने तीनही कलाकारांना त्यांचे इतर कमिटमेंट्सही पुढे ढकलावे लागले आहेत. हा सिनेमा जून मध्ये रिलीज होईल अशी रणबीरची अपेक्षा होती. मात्र आता ती पूर्ण होताना दिसत नाही. यामुळे 'रामायण'ची टीम नाराज आहे. कारण 'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण' दोन्ही सिनेमांच्या रिलीज डेटमध्ये किमान सहा महिन्यांचं अंतर असावं असं त्यांचं प्लॅनिंग होतं. मात्र आता 'लव्ह अँ वॉर'चं शूट पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. यामुळे बजेटही वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच अशीही माहिती आली की संजय लीला भन्साळी पुढील महिन्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमाची पहिली झलक घेऊन येणार आहेत. याचवेळी सिनेमाची रिलीज डेटही समोर येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. सिनेमात साई पल्लवी माता सीता तर साउथ स्टार यश रावणाच्या भूमिकेत आहे. तर सनी देओल हनुमान आहे. सिनेमाचा पहिला भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर येणार आहे. तर दुसरा भाग २०१७ साली रिलीज होणार आहे.