गेल्या ११ वर्षांपासून रणबीर कपूर करतोय बायोपिकवर काम, 'या' प्रसिद्ध गायकाची भूमिका निभावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:34 AM2023-02-27T10:34:29+5:302023-02-27T10:36:05+5:30

रणबीर कपूर कोलकता येथे आगामी फिल्मच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता.

Ranbir Kapoor has been working on the biopic of legendary singer for 11 years | गेल्या ११ वर्षांपासून रणबीर कपूर करतोय बायोपिकवर काम, 'या' प्रसिद्ध गायकाची भूमिका निभावणार

गेल्या ११ वर्षांपासून रणबीर कपूर करतोय बायोपिकवर काम, 'या' प्रसिद्ध गायकाची भूमिका निभावणार

googlenewsNext

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आगामी 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लव्ह रंजन (Luv Ranjan) या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आहेत. सप्टेंबर २०२१ मझ्ये लव्ह रंजन यांनी क्रिकेट विश्वातील दादा सौरभ गांगुली (Saurabh Ganguly) यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली होती. मात्र रणबीरने नुकतीच एका वेगळ्या बायोपिकवर काम करत असल्याचा खुलासा केला  आहे. तब्बल ११ वर्षांपासून रणबीर कपूरकिशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे.

रणबीर कपूर कोलकता येथे फिल्मच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी त्याने ईडन गार्डन्स येथे सौरव गांगुली यांच्यासोबत क्रिकेटचा आनंद लुटला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याला प्रश्न विचारण्यात आला की तो सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे का? तर यावर रणबीर म्हणाला,'दादा (सौरभ गांगुली) भारतातच नाही तर जगातले दिग्गज व्यक्ती आहेत. त्यांच्यावरील बायोपिक ही नक्कीच खास असेल. खरं तर मला हा सिनेमा ऑफर झालेला नाही. मला वाटतं लव्ह रंजन फिल्ममेकर्स अजुनही स्क्रीप्टवर काम करत आहेत.'

रणबीर पुढे म्हणाला, 'मी ११ वर्षांपासून किशोर कुमार यांच्यावरील बायोपिकवर काम करत आहे. अनुराग बसु यांच्यासोबत आम्ही लेखन करत आहोत. मला आशा आहे ही माझी आगामी बायोपिक असेल. मात्र दादा वर बायोपिक बनत आहे याबाबतीत मी अजून काही ऐकले नाही त्यामुळे मला काहीच माहित नाही.'

Ranbir Kapoor : पाकिस्तानी सिनेमात काम करायला आवडेल या विधानावर रणबीरचा 'यू-टर्न', म्हणाला, 'कलेपेक्षा देशच...'

रणबीर कपूरने याआधी संजय दत्त (Sanjay Dutt) वरील बायोपिकमध्ये काम केले आहे. 'संजू' या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुकही झाले. आता रणबीर किशोर कुमार यांच्या भूमिकेत कसा दिसतो यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Ranbir Kapoor has been working on the biopic of legendary singer for 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.