रणबीर कपूर खोटं बोलला? 'रामायण'साठी नॉनव्हेज सोडल्याचा केलेला दावा अन् आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:16 IST2025-11-24T11:13:52+5:302025-11-24T11:16:13+5:30
'रामायण'साठी सोडलेलं स्मोकिंग, नॉनव्हेज; आता 'डायनिंग विथ द कपूर्स'मध्ये खाल्लं नॉनव्हेज?

रणबीर कपूर खोटं बोलला? 'रामायण'साठी नॉनव्हेज सोडल्याचा केलेला दावा अन् आता...
अभिनेता रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित सिनेमात तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. गेल्या वर्षी रणबीरने लाईफस्टाईलमध्ये बदल करत स्मोकिंग सोडल्याचा दावा केला होता. तसंच आता आपण शाकाहारी झालो असल्याचंही तो म्हणाला होता. रणबीरने 'रामायण'सिनेमासाठीच हे पाऊल उचललं होतं. पण आता नुकत्याच आलेल्या 'डायनिंग विथ द कपूर्स' या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीमध्ये रणबीर चक्क मटण खाताना दिसला. यामुळे सोशल मीडियावर रणबीरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
'डायनिंग विथ द कपूर्स' डॉक्युमेंटरीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरमान जैनने सर्व कपूर सदस्यांसाठी वेगवेगळ्या डिशेस बनवल्या आहेत. फिश करी राईस, मटण आणि पाया असं बरंच काही आहे. करीना, करिष्मा, सैफ अली खान, नीतू कपूर, रीमा जैन असे सगळेच हे स्वादिष्ट जेवण एन्जॉय करत आहेत. या सगळ्यांमध्ये रणबीर कपूरही बसला असून तोही नॉनव्हेज खात असल्याचा दावा केला जात आहे.
Ranbir Kapoor's PR team claimed he gave up non vegetarian food out of respect for playing Lord Ram in the Ramayana movie but he is seen enjoying fish curry, mutton, and paya with his family. Ranbir Kapoor has the most effective PR in Bollywood. #DiningWithTheKapoorspic.twitter.com/Q3UKNnhfTZ
— 🌱 (@sharvarilove) November 23, 2025
रणबीरने 'रामायण'साठी नॉनव्हेज सोडल्याचा दावा रणबीर कपूरच्या पीआर टीमने केला होता. रणबीरने स्वत:ही हे सांगितलं होतं. पण आता तो नॉनव्हेज एन्जॉय करताना दिसतोय. यावरुन त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. 'रणबीरकडे सर्वात प्रभावी पीआय टीम आहे','रणबीर पीआर टीमला म्हणतो- तू झुठी मै मक्कार' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'रामायण' पुढील वर्षी डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा दोन पार्ट्समध्ये येणार आहे. २०२७ मध्ये दुसरा भाग येणार आहे. सिनेमात कन्नड सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत आहे तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे.