रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:36 IST2021-12-16T12:35:35+5:302021-12-16T12:36:22+5:30

रणबीरच्या (Ranbir Kapoor) या प्रश्नावर आलिया (Alia Bhatt) उत्तर देऊ शकली नाही. पण ती लाजून लाल नक्कीच झाली. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Ranbir Kapoor asks to Alia Bhatt when we will marry watch her reaction video viral | रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर

रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) बॉलीवुड इंडस्ट्रीतील पॉप्युलर कपलपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाची फॅन्स आतुरतेने वाटत बघत आहेत. अशात रणबीरने स्वत:च आलियाला विचारलं की, आपण दोघे कधी लग्न करणार आहोत. रणबीरच्या या प्रश्नावर आलिया उत्तर देऊ शकली नाही. पण ती लाजून लाल नक्कीच झाली. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बुधवारी 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं. यावेळी रणबीर कपूर आणि आलिया सोबत दिसले. व्हिडीओत बघू शकता की, रणबीर एका फॅनचा प्रश्न वाचतो.  ज्यावर लिहिलं असतं की, तू आलिया किंवा आणखी कुणासोबत लग्न कधी करणार आहे? यावर उत्तर देताना रणबीर म्हणतो की, गेल्यावर्षी आणि यावर्षी आपण अनेक लोकांना लग्न करताना पाहिलंय.  मला वाटतं आपण आनंदी व्हायला हवं. मग तो अचानक आलियाला विचारतो की, आपलं लग्न कधी होणार? यावर आलिया लाजत म्हणते की, तू मला हे का विचारत आहे?

रणबीरचा प्रश्न ऐकून लाजली आलिया

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लगेच अयान मुखर्जीकडे इशारा करत म्हणाला की, मी त्याला विचारत आहे की, आपलं लग्न कधी होणार आहे? यावर अयान म्हणाला की, आजसाठी फक्त एकच डेट पुरेशी आहे आणि ती हे ब्रम्हास्त्रची डेट. रणबीर कपूर एका व्हिडीओत आलियाची गंमत करताना दिसत आहे. त्याने आलियाला गंमतीने विचारलं की, तुझ्या आयुष्यात 'आर' चा अर्थ काय आहे? यावर आधी तर ती लाजली आणि मग तिने कसंतरी उत्तर दिलं.

ब्रम्हास्त्र सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. तर करण जोहरने या बिग बजेट सिनेमाची निर्मिती केली आहे. अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही यात भूमिका आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी ९ सप्टेंबरला रिलीज होणार  आहे.
 

 

Web Title: Ranbir Kapoor asks to Alia Bhatt when we will marry watch her reaction video viral