"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:38 PM2023-12-20T12:38:03+5:302023-12-20T12:38:25+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची तुलना पॉर्नबरोबबर केली आहे.

ranbir kapoor animal movie arshad warsi compared sandeep reddy film with porn | "मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाची भुरळ चाहत्यांना पडली आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणबीरच्या 'ॲनिमल' सिनेमासमोर बॉक्स ऑफिसवर इतर सिनेमांना टिकणं मुश्किल झालं आहे. जिकडेतिकडे 'ॲनिमल'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'ॲनिमल'मधील काही सीन्स आणि संवादावर आक्षेपही घेण्यात आला होता. यामुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनेरणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची तुलना पॉर्नबरोबबर केली आहे. 

"कदाचित सीरियस अभिनेत्यांना 'ॲनिमल' सिनेमा आवडला नसेल, पण मला हा चित्रपट आवडला. किल बिलचं हे मेल व्हर्जन आहे. मी चित्रपटांना फक्त मनोरंजनाच्या माध्यमातून बघतो. मला जास्त विचार करायचा नसतो. जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता तेव्हा तुम्हाला हेच हवं असतं. मला शिकवू नका, मी हे शाळेत शिकलो आहे," असं अर्शद वारसी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

"काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या बघायला आवडतात, पण करायला आवडत नाहीत. 'ॲनिमल' हा चित्रपटही असाच आहे. जेव्हा इंद्र कुमार यांनी मला ग्रँड मस्तीसाठी विचारलं होतं. पण, मला असे चित्रपट करायला आवडत नाहीत. एक प्रेक्षक म्हणून हे चित्रपट बघण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण, अभिनेता म्हणून असे चित्रपट मी करणार नाही. मला पॉर्न आवडतं पण, मला ते करायचं नाही," असंही अर्शद वारसीने सांगितलं. 

दरम्यान, 'ॲनिमल' सिनेमाने १८ दिवसांत देशभरात ५१७ कोटी तर जगभरात ८४३ कोटींचा गल्ला जमवला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 

Web Title: ranbir kapoor animal movie arshad warsi compared sandeep reddy film with porn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.