दिवाळीला नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया, पापाराझींना केली विनंती; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:30 IST2025-10-18T15:29:47+5:302025-10-18T15:30:15+5:30
बंगल्याची किंमत वाचून व्हाल थक्क

दिवाळीला नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया, पापाराझींना केली विनंती; म्हणाले...
बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) प्रचंड चर्चेत असतात. दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. दोघेही चाहत्यांना कपल्स गोल देताना दिसतात. ही लोकप्रिय जोडी सध्या त्याच्या नव्या बंगल्यामुळे चर्चेत आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या घराचं काम आता पूर्ण झालं आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या दोन दिवसात कपूर कुटुंब नव्या घरी शिफ्ट होणार आहे.
आलिया आणि रणबीरने निवेदन देत लिहिले, "दिवाळीचा सण हा आभार मानण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी खास दिवस असतो. आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होण्यास सज्ज आहोत. तुम्ही दाखवलेल्या स्नेह आणि पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत. आम्हाला आशा आहे की आमची प्रायव्हसी अशीच कायम राहील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमचे खूप खूप प्रेम. दिवाळीच्या शुभेच्छा.
आलिया आणि रणबीरच्या नव्या आलिशान घराचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात सहा मजली बंगल्याची एक झलक दिसते. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेला हा बंगला अत्यंत भव्य आणि सुंदर दिसतोय. घराच्या सजावटीकडे रणबीर आणि आलियाने स्वतः लक्ष दिलं होतं. प्रत्येक मजल्यावरील बाल्कनीमध्ये झाडे लावण्यात आली आहे. रणबीर-आलियाच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. त्यांच्या ड्रीम होमची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हे घर आलिया आणि रणबीरसाठी खूप खास आहे, कारण हा कपूर कुटुंबाचा वारसा आहे. सुरुवातीला रणबीरचे आजोबा राज कपूर आणि आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर असलेले हे घर नंतर ऋषी आणि नीतू कपूर यांना मिळाले होते. आता या दाम्पत्याने हा वारसा रणबीर आणि आलियाला दिला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल २४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.