किस बाई किस! आलिया - रणबीरचा KiSS करुन नका मिस, थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 12:14 IST2020-05-20T12:12:29+5:302020-05-20T12:14:23+5:30

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.

Ranbir kapoor and alia bhat throwback video viral on social media gda | किस बाई किस! आलिया - रणबीरचा KiSS करुन नका मिस, थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल

किस बाई किस! आलिया - रणबीरचा KiSS करुन नका मिस, थ्रो बॅक व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्स पैकी एक आहेत. दीर्घकाळापासून दोघे एकमेकांना डेट करतायेत. दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशीदेखील चर्चा आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटदेखील केले जाते. आता लॉकडाऊनमध्ये आलिया रणबीरचा जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

या व्हिडीओमध्ये रणबीर आलियाला किस करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ झी सिने अॅवॉर्डसमधला आहे. या अॅवॉर्ड सोहळ्यात जशी आलियाच्या नावाची घोषणा होते तसा रणबीर कपूर खूप खुश होतो. रणबीर कपूर शुभेच्छा देण्यासाठी आलियाला जवळ घेतो. याच दरम्यान चुकून दोघांच्या ओठांची टक्कर होणार असते पण क्षणात दोघे परिस्थितीला संभाळून घेतात. 

रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वेळी आलिया संपूर्ण वेळ त्याच्यासोबत दिसली. तसेच नीतू कपूर यांना आधार देताना देखील दिसली. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर व आलिया लीड रोलमध्ये आहेत. अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे. सिनेमाचे 40 % शूटिंग बाकी असल्याने  हा सिनेमा आता पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ranbir kapoor and alia bhat throwback video viral on social media gda