Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: आलिया-रणबीरच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी येणार, पाहुण्यांची यादी लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:49 IST2022-04-05T19:49:07+5:302022-04-05T19:49:52+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा १३ ते १७ एप्रिल दरम्यान आहेत. आता हळुहळु या लग्नाशी संबंधित बाकीचे तपशीलही समोर येत आहेत. या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे नुकतेच समोर आले आहे.

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: आलिया-रणबीरच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी येणार, पाहुण्यांची यादी लीक
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही काळ अशी चर्चाही सुरू होती की या जोडप्याने त्यांचे नाते पुढच्या पातळीवर न्यायचे ठरवले आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहेत. आता हळुहळु या लग्नाशी संबंधित बाकीचे तपशीलही समोर येत आहेत. या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे नुकतेच समोर आले आहे.
रणबीर आणि आलियाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहते खूप खुश आहेत. या रॉयल वेडिंगला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, करण जोहर, झोया अख्तर, डिझायनर मसाबा गुप्ता, अभिनेता वरुण धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही उपस्थित असेल.
या नावांव्यतिरिक्त, आणखी काही संभाव्य नावे या भव्य लग्नाचा भाग असतील जी या जोडप्याच्या जवळचे व्यक्ती आहेत. त्यात अर्जुन कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अनुष्का रंजन यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्टने तिचा चित्रपट 'डियर जिंदगी'चा कोस्टार आणि बॉलिवूड शाहरुख खानलाही तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. यामध्ये करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि अयान मुखर्जी यांचीही नावे निश्चित झाली आहेत.
रणबीर आणि आलियाच्या जवळच्या मित्रांची ही यादी आहे. अर्थात लग्नाला दोघांचे कुटुंबीयही उपस्थित राहतील. त्यात नीतू कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या नावांचा समावेश आहे. अलीकडेच रणबीर कपूरला लग्नाआधी बॅचलर पार्टी करायची आहे असे ऐकायला मिळत आहे.