Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:38 PM2022-09-16T15:38:46+5:302022-09-16T15:39:19+5:30

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत....

ranbir kapoor alia bhatt Brahmastra Box Office Collection Day 7 First Week Total Collection 170 Crore | Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

googlenewsNext

 Brahmastra Box Office Collection Day 7:    रणबीर कपूरआलिया भटचाब्रह्मास्त्र’ ( Brahmastra) हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला. गेल्या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं धमाकेदार कमाई केली. ‘बायकॉट बॉलिवूड’चं संकट असताना पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 36.42 कोटींचा गल्ला जमवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर गेल्या 7 दिवसांत सर्व भाषेत 170.11 कोटींची शानदार कमाई केली. एकट्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत.

सोमवारपासून लागली ओहटी
काल गुरूवारी ‘ब्रह्मास्त्र’ने सर्व पाचही भाषेत देशात 9 कोटींचा बिझनेस केला. हिंदी व्हर्जनने काल सातव्या दिवशी 8.50 कोटी कमावले. बुधवारी या चित्रपटाने सर्व भाषेत 10.53 कोटीचा बिझनेस केला होता. हिंदीत या चित्रपटाने 9.50 कोटींचा गल्ला जमवला. गुरूवारी चित्रपटगृहांत ऑडियन्स ऑक्यूपेन्सी 11.77 टक्के होती. पहिल्या दिवशी हाच दर 45 ते 50 टक्के होता. सोमवारपासून ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रेक्षकांची संख्या घटताना दिसतेय. अर्थात शनिवार आणि रविवारी पुन्हा एकदा हा सिनेमा गर्दी खेचणार, असा विश्वास जाणकारांना वाटतोय.

शनिवार, रविवारी कमाई वाढणार?
‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईची गती सोमवारपासून मंदावली आहे. मात्र उद्या शनिवार व रविवारी कमाईत वाढ नोंदवली जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. याचं कारण म्हणजे, चित्रपटगृहांत दुसरा कोणताही मोठा हिंदी सिनेमा नाही. त्यामुळे फॅमिली आऊटिंगसाठी ‘ब्रह्मास्त्र’ परफेक्ट मानला जात आहे. या चित्रपटातील व्हिज्युअल ट्रिट अर्थात मोठ्या पडद्यावर पाहण्याच्या दृष्टीने ‘ब्रह्मास्त्र’ एक चांगला सिनेमा आहे आणि त्यामुळे या वीकेंडला ‘ब्रह्मास्त्र’चं नशीब पुन्हा फळफळणार, अशी चिन्हं आहेत.

खरी अग्निपरिक्षा येत्या सोमवारी
‘ब्रह्मास्त्र’ची खरी अग्निपरिक्षा येत्या सोमवारी असेल. असं यासाठी कारण पहिल्याच सोमवारी चित्रपटाच्या कमाईत 15 ते 20 टक्के घट झाली. त्यामुळे रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी ही कमाई 4 ते 5 कोटींवर येऊ शकते. असं झालंच तर ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्ससाठी ही चिंता वाढवणारी बाब ठरले. चित्रपटाचा बजेट 410 कोटी आहे आणि अशात चित्रपट हिट व्हायचा असेल तर या चित्रपटाने 500 कोटींची कमाई करणे अपेक्षित आहे. चित्रपट 200 कोटींचा आकडा सहज गाठेल. पण 500 कोटींचा आकडा गाठणं सध्या तरी सोप्प नाहीये.
वर्ल्डवाईड कमाईचं म्हणाल तर एका आठवड्यात ‘ब्रह्मास्र’ने वर्ल्ड वाइड 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: ranbir kapoor alia bhatt Brahmastra Box Office Collection Day 7 First Week Total Collection 170 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.