रणबीरने मारला ‘मौके पे चौका’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 13:43 IST2016-10-30T13:43:55+5:302016-10-30T13:43:55+5:30

शीर्षक वाचून तुम्हाला वाटेल की, ‘रणबीरला कशाची संधी मिळाली आणि त्यावर त्याने चौकाही मारला? एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये त्याने चांगला ...

Ranbir hit 'Chaukoye Chouke'! | रणबीरने मारला ‘मौके पे चौका’!

रणबीरने मारला ‘मौके पे चौका’!

र्षक वाचून तुम्हाला वाटेल की, ‘रणबीरला कशाची संधी मिळाली आणि त्यावर त्याने चौकाही मारला? एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये त्याने चांगला स्कोअर केला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा... त्याचा नुकतेच रिलीज झालेल्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर उत्तम ओपनिंग केली. 

त्यात त्याचे ऐश्वर्यासोबत असलेले हॉट सीन्स चांगलेच चर्चेत आहेत. त्या सीन्सविषयी त्याला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,‘ मी हे सीन्स करताना प्रथम खुपच नर्व्हस होतो. ऐशच्या गालाला हात लावताना माझा अक्षरश: थरकाप व्हायचा. ऐश मला म्हणायचीही की, तू सीन एकदम प्रॉपर कर. मग मी विचार केला की, कब ऐसा मौका मिलेगा? सो मैंने भी मौके पे चौका मार दिया!’  

यातील सीन्स बच्चन कुटुंबियांना काही पटलेच नाहीत. ऐशचे सासरेबुवा यांनी ते चित्रपट रिलीज झाला तरी पाहिले नसल्याचे सांगितले आहे. यात खरं किती आणि खोटं किती हे बिग बींनाच माहित नाही का? पाहूनही न पाहिल्यासारखे तर ते मत व्यक्त करत नाहीयेत ना?

ranbir kapoor

Web Title: Ranbir hit 'Chaukoye Chouke'!