'रामायण'च्या VFX साठीच लागणार ३०० दिवस? रणबीर कपूरच्या सिनेमाबद्दल नवीन अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:40 IST2025-10-01T15:39:58+5:302025-10-01T15:40:20+5:30
'रामायण' भाग १ चं शूटिंग जून महिन्यातच संपलं.

'रामायण'च्या VFX साठीच लागणार ३०० दिवस? रणबीर कपूरच्या सिनेमाबद्दल नवीन अपडेट
रणबीर कपूर 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. यश रावण तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या पहिल्याच पार्टचं शूट संपलं आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि टीमने यासाठी खूप बारकाईने काम केलं आहे. तर आता लेटेस्ट अपडेटनुसार सिनेमाच्या VFX साठीच ३०० दिवस लागणार आहेत.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, 'रामायण'चे मेकर्स सध्या व्हीएफएक्सवर काम करत आहेत. 'रामायण' भाग १ चं शूटिंग जून महिन्यातच संपलं. तसंच नितेश तिवारींनी पहिल्या भागाचं एडिटिंगही पूर्ण केलं. त्यांनी रन टाईम निश्चित केला आहे आणि फुटेज लाईन अप केलं आहे. व्हीएफएक्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. टीम सध्या पोस्ट प्रोडक्शसाठी शेवटच्या एडिटिंगवर काम करत आहे.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की निर्माते नमित मल्होत्रा आणि त्यांची टीम पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत रामायण: भाग १ चा फायनल कट तयार करतील. यानंतर दिवाळीला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल. सिनेमाबाबतीत निर्मात्यांकडे मोठं मार्केटिंग प्लॅनिंगही आहे जे त्या त्या वेळी केलं जाईल. 'रामायण'आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट आणि मोठा सिनेमा मानला जात आहे. येत्या काही काळात पार्ट २ चंही शूट सुरु होणार आहे.