लॉस एंजेलिसमध्ये दिसली रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक, अभिनेता म्हणाला- "प्रभू राम हे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:05 IST2026-03-31T14:05:10+5:302026-03-31T14:05:47+5:30
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर २ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मात्र त्याआधीच लॉस एंजिलेसमध्ये 'रामायण'ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.

लॉस एंजेलिसमध्ये दिसली रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक, अभिनेता म्हणाला- "प्रभू राम हे..."
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर २ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मात्र त्याआधीच लॉस एंजिलेसमध्ये 'रामायण'ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. 'रामायण'मधील रामची झलक पाहून चाहते थक्क झाले. या इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा उपस्थित होते. काही मोजक्या चाहत्यांच्या उपस्थितीत हा इव्हेंट पार पडला. यावेळी रणवीरने चाहत्यांसोबत संवादही साधला. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल रणबीरने सगळ्यांचे आभार मानले. "इथे येऊन तुमच्यासमोर आमचं हे प्रेमाचं काम सादर करणं माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. तुम्ही सगळे खरं तर हे पाहणारे पहिलेच प्रेक्षक आहात, आणि याचा आम्हाला आनंद आहे. भगवान राम शतकानुशतकं जगभरातील कोट्यवधी लोकांच्या अंत:करणाचे मार्गदर्शक राहिले आहेत. ते मानवी आत्म्याच्या विजयाची शिकवण देतात. ते करुणा, धैर्य, नितिमत्ता आणि क्षमाशीलतेचं प्रतीक आहेत. म्हणूनच त्यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आदर्श पुरुष असा होतो", असं म्हणत रणबीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
Superstar Ranbir Kapoor talking about Prabhu Shree Rama in Los Angeles, Usa during Ramayana Glimpse Screening Event pic.twitter.com/jHmKlHJ9jq
— The Ramayana 🏹 (@RamayanaSaga) March 30, 2026
'रामायण'ची स्टारकास्ट
'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. साऊथ सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय लारा दत्ता, रवी दुबे, सनी देओल, अरुण गोविल अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.