आता कोटीत कमावणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा पहिला पगार किती होता माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:05 PM2024-02-20T13:05:18+5:302024-02-20T13:12:57+5:30

रकुलने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत स्वत:चे नाव कमावलं आहे.

Rakul Preet Singh's net worth: What was Rakul Preet Singh's first salary? | आता कोटीत कमावणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा पहिला पगार किती होता माहिती आहे का?

आता कोटीत कमावणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा पहिला पगार किती होता माहिती आहे का?

रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रकुल ही जॅकी भगनानीसोबत येत्या 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'गिल्ली' या कन्नड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रकुलने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत स्वत:चे नाव कमावलं आहे.

रकुल प्रीत सिंगने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'यारियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि मेहनतीच्या बळावर आज ती टॉपची अभिनेत्री बनली आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने केवळ नाव आणि लोकप्रियताच कमावली नाही. तर त्यासोबतच भरपूर पैसाही कमावला आहे. चित्रपटात येण्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. त्यावेळी एका शूटसाठी त्याला 5000 रुपये मिळायचे. हाच तिचा पहिला पगार होता. 5 हजार रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज कोटींवर पोहोचला आहे.

 

लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, रकुलची संपत्ती 49 कोटी रुपये आहे. रकुल अनेक ब्रँडच्या जाहिराती करते. यातूनही ती पैसा कमावते. मुंबईतील वांद्रे येथे तिचे स्वतःचे घर आहे. याशिवाय, हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये तिचा 3BHK फ्लॅट असल्याचे म्हटले आहे, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. रकुललाही गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई,  रेंज रोव्हर (स्पोर्ट्स),  BMW 520D अशा महागड्या गाड्या आहेत.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास 'दे दे प्यार दे दे' चित्रपट हिट ठरला. त्यानंतर ती 'शिमला मिर्ची', 'अटॅक पार्ट-1', 'रनवे-34', 'डॉक्टर जी' आणि 'थँक गॉड'मध्ये दिसली होती. मात्र हे पाचही चित्रपट फ्लॉप झाले. आता लवकरच ती 'मेरी पत्नी का रीमेक' आणि 'इंडियन 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचे चाहते दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 
 

Web Title: Rakul Preet Singh's net worth: What was Rakul Preet Singh's first salary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.