कपडे तर घाल...! रकुल प्रीत सिंगच्या फोटोवर युजर्सच्या नको त्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:16 IST2021-03-19T14:14:37+5:302021-03-19T14:16:17+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. आता कोण ट्रोल होतेय तर अभिनेत्री रकुलप्रीत सिंग.

rakul preet singh trolled for wearing bodysuit for magazine photoshoot | कपडे तर घाल...! रकुल प्रीत सिंगच्या फोटोवर युजर्सच्या नको त्या कमेंट्स

कपडे तर घाल...! रकुल प्रीत सिंगच्या फोटोवर युजर्सच्या नको त्या कमेंट्स

ठळक मुद्दे‘यारियां’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.  2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला.

सोशल मीडियावर ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. आता कोण ट्रोल होतेय तर अभिनेत्री रकुलप्रीत सिंग. होय, रकुलने तिच्या ताज्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि हे फोटो पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
रकुलने एका फॅशन मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. यात ती ब्ल्यू कलरच्या बॉडीसूटमध्ये दिसतेय. या लुकला स्टायलिश टच देण्यासाठी तिने यात अनेक एलिमेंटचा वापर केला आहे.

यात तिचे रेड शूज, व्हाईट जॅकेटचा समावेश आहे. या लुकमध्ये ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. पण तिचा हा लूक नेटक-यांच्या काही पचनी पडला नाही. मग काय नेटक-यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत, रकुलला सुनावले.

‘रकुल कदाचित तू पँट घालायला विसरलीस, जरा चेक कर,’ असे एका नेटकºयाने लिहिले. ‘पैशासाठी काय काय करावे लागते,’ असे उपरोधिकपणे एका युजरने म्हटले. अर्थात ट्रोलर्सच्या या कमेंटचा रकुलवर काहीही परिणाम होणार नाही. चाहत्यांनी केलेले कौतुक तिच्यासाठी पुरेसे आहे.  
रकुल सोशल मीडियावर प्रचंड अक्टिव्ह आहे. रकुलने ‘गिल्ली’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तामिळ व तेलगू सिनेमातही ती झळकली. 2014 साली तिने बॉलिवूड डेब्यू केला.

‘यारियां’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.  2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा दिला, ग्लॅमर दिले.

  

Web Title: rakul preet singh trolled for wearing bodysuit for magazine photoshoot