राखी सावंतला विदेशी महिला कुस्तीपटूशी घेतलेला पंगा पडला महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:47 IST2018-11-12T17:41:06+5:302018-11-12T17:47:26+5:30
हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते.

राखी सावंतला विदेशी महिला कुस्तीपटूशी घेतलेला पंगा पडला महागात
अभिनेत्री राखी सावंत मीटू मोहिम व तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादामुळे चर्चेत आली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच राखीने हरियाणात झालेल्या रेसलिंग स्पर्धेत हजेरी लावली होती. मात्र या खेळात तिलाच दुखापत झाली आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सध्या या रेसलिंग स्पर्धेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. विदेशी महिला रेसलर रैवलने फाईट जिंकल्यानंतर तेथे उपस्थित महिलांना ओपन चॅलेंज केले. जर कोणत्याही भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी मुकाबला करावा.
रैवलचे हे चॅलेंज राखी सावंतने स्वीकारले. त्याआधी राखी सावंतने रैवलला तिच्यासारखे डान्स करण्याचे चॅलेंज दिले. तिनेही ते स्वीकारले. यानंतर दोघींमध्ये डान्सची स्पर्धा सुरु झाली. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रैवलनला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रैवलनने राखीला हवेत उचलून जोरात जमिनीवर आपटले. दरम्यान, जमिनीवर जोरात आपटल्यामुळे राखीच्या पाठीत आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे समजते आहे. मात्र आता राखीची प्रकृती ठीक असल्याचे आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी सांगितले. राखीला हे चॅलेंज चांगलेच महागात पडले आहे.