राखी सावंतने न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर; चाहत्यांनी ‘पाणघोडा’ म्हणून उडविली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 17:16 IST2018-01-02T11:41:53+5:302018-01-02T17:16:48+5:30

राखी सावंतने न्यू इअर सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे. परंतु चाहत्यांनी तिच्या या फोटोची चांगलीच खिल्ली उडविली आहे.

Rakhi Sawant shares a photo of New Year celebration; Fan fanatics blown up as 'hood' | राखी सावंतने न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर; चाहत्यांनी ‘पाणघोडा’ म्हणून उडविली खिल्ली!

राखी सावंतने न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर; चाहत्यांनी ‘पाणघोडा’ म्हणून उडविली खिल्ली!

टम गर्ल राखी सावंत तिच्या वक्तव्य आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. खरं तर चर्चेत राहण्यासाठी राखीच अशाप्रकारचा खटाटोप करीत असते. यावेळेस तिने नव्या वर्षाचे निमित्त साधत काही फोटोज् शेअर केले. अर्थात हे सर्व फोटो हॉट असून, चर्चेत राहण्यासाठीच तिने ते शेअर केले असावेत, यात शंका नाही. फोटोमध्ये राखी स्विमसूटमध्ये पूल साइडला बसलेली दिसत आहे. निळ्या रंगाच्या पाण्यासोबत तिचा निळ्या रंगाचा गॉगल खूपच उठून दिसत आहे. मात्र तिचे हे फोटो यूजर्सला फारसे भावले नसल्याचे दिसून येत आहे. कारण तिच्या या फोटोंना सातत्याने नकारात्मक कॉमेण्ट्स मिळत आहेत. त्यामुळे या फोटोंवरून राखी सध्या ट्रोल होत आहे. 
 

दरम्यान, २२ तासांत राखीच्या या फोटोला केवळ पाचच हजार लोकांनी लाइक्स केले आहे, परंतु कॉमेण्ट्समध्ये हा आकडा जास्त आहे. त्यातही यातील बहुतांश कॉमेण्ट्स या नकारात्मकच आहेत. एका यूजरने कॉमेण्ट बॉक्समध्ये लिहिले की, ‘पाणघोडा पाण्याबाहेर सुस्त बसलेला.’ तर तिच्या छोट्या आणि तंग स्विमसूटची खिल्ली उडविताना एका यूजरने लिहिले की, ‘बाकी सर्व काही ठीक आहे फक्त थोडेसे टाइट झाले आहे.’ विवान नावाच्या एका यूजरने लिहिले, ‘मला हा फोटो बघून उलटी येत आहे.’ अशाप्रकारच्या कित्येक कॉमेण्टमधून राखीची खिल्ली उडविली जात आहे. 
 

वास्तविक राखीला अशाप्रकारच्या कॉमेण्ट काही नवीन नाहीत. यापूर्वीही ती अशाप्रकारे ट्रोल झाली आहे. परंतु राखीवर याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. दरम्यान, राखी काही दिवसांपूर्वी तिच्या एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवºयात सापडली होती. या व्हिडीओमध्ये ती एका कंडोम कंपनीची जाहिरात करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी तिचे फेव्हरेट कंडोम फ्लेवर सांगताना दिसत आहे. 

Web Title: Rakhi Sawant shares a photo of New Year celebration; Fan fanatics blown up as 'hood'