राखी सावंतने चक्क टॉपलेस होऊन शेअर केला व्हिडिओ, नेटिझन्सनी दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 14:51 IST2019-11-07T14:51:16+5:302019-11-07T14:51:59+5:30

राखी सावंत या व्हिडिओत बॉलिवूड गाण्यांवर ॲक्ट करताना दिसत आहे आणि चक्क या व्हिडिओत ती टॉपलेस आहे.

rakhi sawant share topless video on instagram | राखी सावंतने चक्क टॉपलेस होऊन शेअर केला व्हिडिओ, नेटिझन्सनी दिल्या अशा कमेंट्स

राखी सावंतने चक्क टॉपलेस होऊन शेअर केला व्हिडिओ, नेटिझन्सनी दिल्या अशा कमेंट्स

ठळक मुद्देराखी या व्हिडिओत बॉलिवूड गाण्यांवर ॲक्ट करताना दिसत आहे आणि चक्क या व्हिडिओत ती टॉपलेस असून तिने अंगावर अंथरूण घेतले आहे. ही गाणी गायल्यानंतर ही गाणी मी माझ्या पतीसाठी गातेय का असे विचारताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राखी सावंत तिच्या सीक्रेट मॅरेजला घेऊन चर्चेत आहे. करवा चौथच्या दिवशी राखीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती गाजराचा हलवा बनवताना दिसली होती. मी युकेत आहे आणि घरी गाजराचा हलवा बनवतेय, असा दावा राखीने या व्हिडीओत केला होता. यावरून राखीला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राखीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

राखी सावंतच्या लग्नाला काही दिवस झाले असले तरी तिने आजही तिच्या पतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाहीये. पण तिच्या पतीविषयी विविध गोष्टी ती सोशल मीडियात बोलताना दिसते. आता तर तिने टिक टॉकला पाच व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती टॉपलेस असून हे व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर देखील शेअर केले आहेत. 

राखी या व्हिडिओत बॉलिवूड गाण्यांवर ॲक्ट करताना दिसत आहे आणि चक्क या व्हिडिओत ती टॉपलेस असून तिने अंगावर अंथरूण घेतले आहे. ही गाणी गायल्यानंतर ही गाणी मी माझ्या पतीसाठी गातेय का असे विचारताना दिसत आहे. राखीच्या पतीविषयी तिचे फॅन्स कमेंटद्वारे विचारत आहेत. 

काही दिवसांपूर्वी राखीने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओतले घर तिचे सासर असल्याचा दावा तिने केला होता. राखीने व्हिडीओत शेअर केलेले घरं कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हते. या व्हिडीओला राखीने कॅप्शन दिले होते की, मी माझ्या पतीची राजकुमारी आहे आणि हे माझं घरं. राखीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. राखी खोटं बोलत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले होते.

राखीने 28 जुलैला एका पंचताराकित हॉटेलमध्ये मुंबईत गुपचुप लग्न केले. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे.

Web Title: rakhi sawant share topless video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.