नव-याच्या प्रेमाखातर राखी सावंतने घेतला मोठा निर्णय, आता करणार नाही ‘हे’ काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 12:25 IST2019-09-25T12:24:34+5:302019-09-25T12:25:15+5:30

सध्या राखी अन् तिचा पती याचीच काय ती चर्चा आहे. राखीने सीक्रेट मॅरेज केले खरे, पण तिचा पती नेमका आहे तरी कोण? हे मात्र कळायला मार्ग नाही. नाही म्हणायला राखी रोज आपल्या मॅरीड लाईफबद्दलचे अपडेट्स देते.

rakhi sawant reveals married life and says she will not do bold scenes on screen | नव-याच्या प्रेमाखातर राखी सावंतने घेतला मोठा निर्णय, आता करणार नाही ‘हे’ काम!!

नव-याच्या प्रेमाखातर राखी सावंतने घेतला मोठा निर्णय, आता करणार नाही ‘हे’ काम!!

ठळक मुद्देपुढील वर्षी आम्ही बाळाचे प्लॅनिंग करणार आहोत, हेही तिने सांगितले.

ड्रामा क्वीन राखी सावंतला चर्चेत राहणे आवडते. साहजिकच यासाठीच रोज नवे  उपद्व्याप ती करते. सध्या राखी अन् तिचा पती याचीच काय ती चर्चा आहे. राखीने सीक्रेट मॅरेज केले खरे, पण तिचा पती नेमका आहे तरी कोण? हे मात्र कळायला मार्ग नाही. नाही म्हणायला राखी रोज आपल्या मॅरीड लाईफबद्दलचे अपडेट्स देते. पण हे अपडेट्स देताना ती बोलते कमी अन् रडते जास्त. सध्या राखी लंडनमध्ये तिच्या पतीजवळ आहे. अर्थात ही सुद्धा तिने दिलेली माहिती. आता राखीने आपल्या गृहप्रवेशाची माहिती दिली आहे.


होय, स्पॉटबॉयशी बोलताना राखीने ही माहिती दिली. ‘मी माझा पती रितेशसोबत आहे. हा माझा गृहप्रवेश आहे. अगदी प्रथापरंपरेनुसार माझा गृहप्रवेश झाला. आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले.
तुझ्या पतीला तू बनवलेले जेवण आवडले का? असे विचारले असता, कालचपाती करपरी. पण मी शिकेल, असे ती म्हणाली. विशेष म्हणजे, यानंतर राखीने जे काही सांगितले, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल.

लग्नानंतरही इंडस्ट्रीतून कामाच्या ऑफर येत आहेत का? असे विचारले असता राखीने एक वेगळाच खुलासा केला. ‘वेबसीरिजच्या ऑफर आहेत. मी बोल्ड सीन्स करावेत, अशी त्यांची अपेक्षा आहेत. पण मी आता बोल्ड सीन्स करणार नाही. कारण रितेशला हे आवडत नाही. त्यामुळे यापुढे मी इंटिमेट सीन्स करणार नाही. मग ते चित्रपटात असो वा वेबसीरिजमध्ये. यापुढे मी खूप रिव्हिलिंग कपडेही घालणार नाही’, असे तिने सांगितले.
पुढील वर्षी आम्ही बाळाचे प्लॅनिंग करणार आहोत, हेही तिने सांगितले.

Web Title: rakhi sawant reveals married life and says she will not do bold scenes on screen