राखी सावंत सांगते, केवळ याच कारणामुळे आजवर माझे झाले नव्हते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 15:50 IST2021-01-01T15:48:59+5:302021-01-01T15:50:29+5:30

राखीने तिचे इतक्या वर्षांत लग्न का झाले नव्हते याविषयी बिग बॉसच्या घरात सांगितले.

rakhi sawant reveals in bigg boss 14 she was item girl in bollywood thus no one ready to marry her | राखी सावंत सांगते, केवळ याच कारणामुळे आजवर माझे झाले नव्हते लग्न

राखी सावंत सांगते, केवळ याच कारणामुळे आजवर माझे झाले नव्हते लग्न

बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे.

राखी सावंत बिग बॉसच्या घरात तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगताना दिसत आहे. तिने या घरात नुकताच एक किस्सा सांगितला आहे. बिग बॉसच्या घरात राखी राहुलसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी राखीने तिचे इतक्या वर्षांत लग्न का झाले नव्हते याविषयी राहुलला सांगितले. राखी चित्रपटात नाचकाम करत असल्याने केवळ तिच्यासोबत कोणी लग्न करत नव्हतं असे ती राहुलला सांगताना दिसत आहे.

राखी राहुलला तिच्या अंगावरच्या काही खुणा दाखवत सांगते, माझा मामा मला लहानपणी खूप मारायचा. त्यामुळे मला अनेकवेळा टाके पडले आहेत. याच्याच खुणा आजवर माझ्या शरीरावर आहेत. माझा मामा आज हयात नाही.  पण तो असताना आम्हाला बाल्कनीमध्ये देखील उभी राहाण्याची परवानगी नव्हती. आम्हाला आयब्रो किंवा वॅक्सिंग करण्यास देखील मज्जाव करण्यात आला होता. आमच्या घरातील महिलांना कोणतीही गोष्ट करण्याची मुभा नव्हती. 

त्यावर राहुल विचारतो की, तुझे वडील आणि मामा दोघे पण अशाप्रकारे वागायचे का आणि त्यांना यासाठी तुझ्या आईचा पाठिंबा असायचा का त्यावर राखी सांगते, त्याकाळात महिलांना घरात काहीही बोलण्याची परवानगी नव्हती. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. माझ्यासाठी पूर्वी लग्नासाठी अनेक स्थळं आली होती पण मी केवळ नृत्य करत असल्याने कोणी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतं. बॉलिवूडमध्ये मी काम करत असल्याने मी चारित्र्यहिन असणार असे लोक मला समजत होते. मला तूच सांग... नर्तिका असणे गुन्हा आहे का?

राखी सावंतचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तिचा नवरा युकेमध्ये राहातो. तो लवकरच बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. राखीचा पती कधीच लोकांच्या समोर आलेला नाहीये. त्यामुळे तो कसा दिसतो हे कोणालच माहीत नाहीये.

Web Title: rakhi sawant reveals in bigg boss 14 she was item girl in bollywood thus no one ready to marry her