इतक्या कोटींची मालकीण आहे राखी सावंत, संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला येईल भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 20:00 IST2019-10-13T20:00:00+5:302019-10-13T20:00:00+5:30
राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

इतक्या कोटींची मालकीण आहे राखी सावंत, संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला येईल भोवळ
ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडत असते आणि त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने रितेश नामक एनआरआयसोबत गुपचुप लग्न केले आहे. तिने लग्न केेले असले तरी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आलेला नाही. तिच्या चाहत्यांना तिचं लग्न झाल्याच्या गोष्टीवर विश्वास नाही. भलेही राखीकडे कोणताही चित्रपट नसला तरीदेखील ती कमाईमध्ये भल्याभल्यांना मागे टाकेल.
चित्रपट अग्निचक्रमधून आपल्या करियरची सुरूवात करणाऱ्या राखी सावंत हिने हिट आयटम साँग केले आहेत. नुकतेच तिचे छप्पन छुरी हे आयटम साँग प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या अनावरणावेळी राखी बोल्ड गेटअपमध्ये आली होती. तिचे या ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल झाले. राखी सांवतने रिएलिटी शोमध्ये एन्ट्री केली आहे.
राखी का स्वयंवर या रिएलिटी शोमध्ये तिने स्वतःचं स्वयंकर केलं होतं. २००९मध्ये लाँच झालेल्या या शोमध्ये राखीने टोरंटोच्या एका स्पर्धकासोबत लग्न केले होते आणि काही महिन्यानंतर तिने विभक्त होत असल्याचं सांगितलं होतं.
राखी सावंतचे वडील मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत आई जया यांच्यासोबत राहते. राखीच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं तर तिच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत आणि एक बंगला आहे. या सर्व संपत्तीची किंमत जवळपास ११ कोटी रुपये आहे.
इतकंच नाही तर इंटरनेटवर असलेल्या माहितीनुसार राखी जवळपास तीन कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे आणि ही संपत्ती तिने स्वतः जमवली आहे. याशिवाय राखीकडे २१.६ लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कारदेखील आहे.
राखीची जास्त कमाई स्टेज परफॉर्मन्समधून होते. याव्यतिरिक्त ती भोजपुरी आयटम साँग करते. यातून तिला जास्त मानधन मिळते.