अखेर संपला राखी सावंतच्या ‘सीक्रेट वेडिंग’चा सस्पेन्स; पती रितेश प्रथमच मीडियासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:06 IST2019-10-09T12:00:03+5:302019-10-09T12:06:45+5:30

ना-ना उपद्‌व्याप करून चर्चेत राहणारी राखी सावंत हिचे सीक्रेट वेडिंग आणि तिचा पती याबद्दलचा सस्पेन्स अखेर संपला.

rakhi sawant husband ritesh talked about married life | अखेर संपला राखी सावंतच्या ‘सीक्रेट वेडिंग’चा सस्पेन्स; पती रितेश प्रथमच मीडियासमोर

अखेर संपला राखी सावंतच्या ‘सीक्रेट वेडिंग’चा सस्पेन्स; पती रितेश प्रथमच मीडियासमोर

ठळक मुद्दे मीडियापासून दूर राहण्याचे कारणही त्याने सांगितले.

ना-ना  उपद्‌व्याप करून चर्चेत राहणारी राखी सावंत हिचे सीक्रेट वेडिंग आणि तिचा पती याबद्दलचा सस्पेन्स अखेर संपला. होय, राखीने खरंच लग्न केले का? या प्रश्नाचे उत्तर आता मिळालेय. कारण आता राखीने खरोखर लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रितेश नावाच्या एनआरआयशी राखीने गुपचून लग्न केले होते. पण या रितेशचा चेहरा अद्यापही कोणी पाहिला नव्हता. त्यामुळे राखीचे हे लग्न म्हणजे नेहमीप्रमाणे तिचा ‘ड्रामा’ असावा, असेच सगळ्यांना वाटत होते. पण आता राखीचा पती प्रथम मीडियासमोर आला.

 रितेशने  ‘स्पॉटबॉय’ या बेवसाईटला मुलाखत देत राखी व त्याचे लग्न झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले. केवळ इतकेच नाही तर राखीबद्दल तो भरभरून बोलला. राखीसारखी महिला मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. ती कॅमे-यासमोर कशीही असो पण माझ्यासाठी ती देवाने दिलेली सुंदर भेट आहे. तिच्यासारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो,असे रितेश यावेळी म्हणाला.


 मीडियापासून दूर राहण्याचे कारणही त्याने सांगितले. ‘मला माझे खाजगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. मी मीडियासमोर का यावे? त्यातून काय साध्य होणार आहे का? उगाच नको त्या चर्चा सुरु होतील.  माझ्याबद्दल लोक काय विचार करतात त्याने मला फरक पडत नाही. माझे कुटुंबीय आणि राखीचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मी योग्य वेळ पाहून मीडियासमोर येईन. सध्या तरी माझा सर्वांसमोर येण्याचा विचार नाही’, असे त्याने सांगितले. 


राखीच्या बोल्ड इमेजबद्दलही तो बोलला. कॅमे-यासमोर राखी बोल्ड आहे. पण आता राखी विवाहित आहे. हे तिचे नवे आयुष्य आहे. आपल्या पत्नीने कॅमेºयासमोर बोल्ड सीन्स करावेत, असे कुठल्याही पतीला वाटणार नाही. पण हो, तिच्या कपड्यांवर मला अजिबात आक्षेप नाही. ती तिच्या आवडीचे कपडे घालू शकते, असेही तो म्हणाला.

Web Title: rakhi sawant husband ritesh talked about married life