'या' अभिनेत्रीचं उर्फीच्या पावलावर पाऊल, अंगावर पोतं चढवून पोहोचली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 14:00 IST2023-10-14T13:58:26+5:302023-10-14T14:00:30+5:30

ही उर्फी नसून दुसरीच अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलंत का बघा.

rakhi sawant dressed as urfi javed wore a sack as no one recognized her in this | 'या' अभिनेत्रीचं उर्फीच्या पावलावर पाऊल, अंगावर पोतं चढवून पोहोचली; Video व्हायरल

'या' अभिनेत्रीचं उर्फीच्या पावलावर पाऊल, अंगावर पोतं चढवून पोहोचली; Video व्हायरल

उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव आता नवीन नाही. तिच्या विचित्र फॅशनमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे ती सतत ट्रोल करत असते. पापाराझी तर तिला सतत फॉलो करत असतात. दरम्यान आता एक असा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एकीने उर्फीसारखीच फॅशन केली आहे. तिने चक्क अंगावर पोतं चढवलं आहे. यात तिचा चेहरा दिसून येत नाही. पण ही उर्फी नसून दुसरीच कोणीतरी आहे. तुम्ही ओळखलंत का बघा.

voompla या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नियॉन रंगाच्या आऊटफिटवर एका अभिनेत्रीने चक्क पोतंच चढवलं आहे. डोळे आणि नाकाच्या ठिकाणी पोत्याला भोक आहे. ही अभिनेत्री कारमधून खाली उतरते आणि कसंतरी चालताना दिसत आहे. पापाराझी तिला आज काय गोणीत असं विचारतात तेव्हा ती म्हणते, आज मी अली गोनी बनून आले आहे आणि जोरजोरात हसते.' आज उर्फीचा वाढदिवस असल्याचं पापाराझी तिला सांगतात तेव्हा ती म्हणते, ओह मग ही स्टाईल तिलाच डेडिकेट करुया.  असं म्हणत ती निघून जाते.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपली ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आहे. राखीच्याही डोक्यावर उर्फीचं भूत चढलेलं दिसतंय. तिची फॅशन बघून पापाराझीही हैराण झाले. तर नेटकऱ्यांनीही कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. 'शेवटी कचरा पोत्यात गेलाच' अशी कमेंट एकाने केली आहे. हळूहळू राखीही उर्फीच्या मार्गावर चालताना दिसत आहे. 

Web Title: rakhi sawant dressed as urfi javed wore a sack as no one recognized her in this