दणक्यात साजरा झाला राखी सावंतचा वाढदिवस, किती वर्षांची झाली? बर्थडे गिफ्ट म्हणून मिळाली 'ही' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:34 IST2025-11-27T10:33:50+5:302025-11-27T10:34:27+5:30
राखी सावंतने तिचा वाढदिवस मुंबईत जवळच्या मित्रांसोबत साजरा केला.

दणक्यात साजरा झाला राखी सावंतचा वाढदिवस, किती वर्षांची झाली? बर्थडे गिफ्ट म्हणून मिळाली 'ही' गोष्ट
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच राखी सावंतने तिचा वाढदिवस साजरा केला. राखी सावंत यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७८ रोजी झाला होता. आता ती ४७ वर्षांची झाली. राखीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
राखीचा वाढदिवस हा २५ नोव्हेंबरला असतो. पण, यावर्षी तिचं बर्थडे सेलिब्रेश काल वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी झालं. राखीच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ज्यात राखी ही चार टायरचे दोन केक कापताना दिसत आहे. राखीनं तिच्या वाढदिवसाचा पुरेपूर आनंद लुटल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
राखीनं 'बिग बॉस १८' फेम हेमा शर्मासोबत 'परदेसिया' या गाण्यावर नृत्य केले. या गाण्याने राखी सावंतला अनेक वर्षांपूर्वी आयटम डान्सर म्हणून लोकप्रिय केले होते. यांचं गाण्यावर राखी पुन्हा एकदा थिरकताना दिसली आहे. वाढदिवासाचं बर्थडे गिफ्ट म्हणून राखी सावंतला एका व्यक्तीनं लाखो रुपयांची आलिशान बॅग दिली. परंतु, अनेक युजर्सनी "ही बनावट आहे" अशी टिप्पणी केली.
राखी कितीही बिन्धास्त दिसत असली तरी तिचा स्ट्रगल खुप कठिण आहे. राखीने तिच्या आयुष्यात कठिण प्रसंगाचा सामना केला आहे. तिने 'अग्निचक्र' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर तिने 'जोश', 'जिस देश में गंगा रहता है' आणि 'ये रास्ते हैं प्यार के' यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका आणि आयटम साँग केले. तिच्या संघर्षाने भरलेल्या प्रवासासोबतच राखीचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे. ज्यामुळे तिला "कंट्रोव्हर्सी क्वीन ऑफ द शो" आणि बॉलिवूडची "ड्रामा गर्ल" म्हणूनही ओळखले जाते.