राखी सावंत कधीच होऊ शकत नाही आई?, आदिल दुर्रानीचा दावा, म्हणाला - "तिने गर्भाशय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 19:14 IST2023-08-21T19:13:48+5:302023-08-21T19:14:18+5:30

Rakhi Sawant And Adil Durrani : राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी आता तुरुंगाबाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच आदिलने राखीवर गंभीर आरोप केले आहेत.

Rakhi Sawant can never be a mother?, claims Adil Durrani, said - "She has a uterus..." | राखी सावंत कधीच होऊ शकत नाही आई?, आदिल दुर्रानीचा दावा, म्हणाला - "तिने गर्भाशय..."

राखी सावंत कधीच होऊ शकत नाही आई?, आदिल दुर्रानीचा दावा, म्हणाला - "तिने गर्भाशय..."

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. राखी सावंतसोबत तिचे लग्नंदेखील खूप चर्चेत आले आहे. अभिनेत्रीने आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांना हैराण केले होते. लग्नाला काही दिवस होत नाही तर राखीने आदिलवर बरेच गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर पोलिसात तक्रारदेखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ६ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर आता आदिल तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याने तिच्याबाबतीत काही दावेही केले आहेत. पापाराझींशी बोलताना राखीने तिला आई व्हायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

राखी सावंतने एकदा पापाराझींसमोर म्हटले होते की, मला आता आई बनायचे आहे. मी आता पार्टनर पाहते आहे जो माझ्या बाळाचं वडील बनेल. चला या नव्या कॉन्टेस्टसा सुरुवात करुयात. मी माझ्या बाळासाठी वडील शोधते आहे. मात्र आता तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आदिलने राखी सावंतच्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला आहे. तसेच राखीने मीडियाला सांगितले होते की, तिचे मिसकॅरेज झाले होते. त्यावर आदिल म्हणाला की, ती प्रेग्नेंट कशी होऊ शकते. तिला काहीतरी समस्या आहेत. ज्यानंतर तिचे ऑपरेशन झाले आणि तिने तिचे गर्भाशय काढून टाकले आहे. मी स्वतः तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. जेव्हा मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला पोलिसांनी अटक केली होती. अशात ती आई कशी होऊ शकते. 

रितेशला राखीने दिला नाही घटस्फोट
आदिल पुढे म्हणाला की, फेब्रुवारीत राखीने माझे कपडे फेकून दिले आणि मला म्हणाली की, मी तुला कुत्रा बनवलं आहे. आता बघते की तू सर्वांसोबत कसा डील करतो. माझे पासपोर्ट, डेबिट कार्ड, काही महागड्या गोष्टी, हिऱ्यांची अंगठी, सर्वकाही राखीच्या घरी होते. मी तिला म्हणालो होतो की, राखी सोडून दे आपण थोडा ब्रेक घेऊयात आणि त्या गोष्टी दे. मी मैसूरला जातो.  ती म्हणाली ठीक आहे. उद्या सकाळी येऊन तुझं सामान घेऊन जा. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी घरी गेलो तेव्हा ती रडत मला म्हणाली की तु उद्या मीडियाला माझ्या आणि रितेशबद्दल सांगशील. मी रितेशला तलाक दिला नाही आणि तुझ्याशी लग्न केले. मला तुरुंगवास होईल. थो्ड्या वेळाने बेल वाजली आणि तिने दरवाजा खोलला. जे कोणी आले ते तिच्या पाया पडू लागले आणि म्हणू लागले की, मला वाचव, हा मला मारत आहे.

राखीने माझ्या कुटुंबाला दिली होती धमकी 
आदिलने पुढे सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जामीन मिळवून दिला आणि त्यानंतरच तो बाहेर येऊ शकला. आदिल म्हणाला- राखीने माझ्या आई-वडिलांना धमकी दिली होती की, जर त्यांनी तिला मालमत्ता आणि पैसे दिले नाहीत तर ती मला जेलमध्ये मारून टाकेल. मी मुंबईत आलो तर ती माझे पाय मोडेल. तो पुढे म्हणाला - राखी मला मारायची, मारहाण करायची. हे सर्व सुरू झाले होते. मी पूर्णपणे हैराण झालो होतो म्हणून लग्नाबद्दल मी कोणालाच सांगितले नव्हते.
 

Web Title: Rakhi Sawant can never be a mother?, claims Adil Durrani, said - "She has a uterus..."