'मला किडनीची आवश्यकता आहे'; राखी सावंतने केली चाहत्यांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:45 IST2022-03-27T16:43:21+5:302022-03-27T16:45:39+5:30
Rakhi sawant: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राखीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांकडे चक्क किडनी द्या अशी मागणी केली आहे.

'मला किडनीची आवश्यकता आहे'; राखी सावंतने केली चाहत्यांना विनंती
आपल्या वायफळ बडबडीमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत(Rakhi Sawant) . ड्रामा क्वीन या नावाने ओळखली जाणारी राखी कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यावेळीदेखील राखी तिच्या अशाच बडबडीमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना चक्क किडनी देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राखी चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राखीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांकडे चक्क किडनी द्या अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे राखीला कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी किडनी नको असून आयफोन खरेदी करण्यासाठी किडनी हवी आहे. त्यामुळे तिच्या या वायफळ बडबडीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
काय म्हणाली राखी?
"माझ्या आयडीवर हे हार्ट इमोजी नका पोस्ट करु. त्याऐवजी मला किडनी पाठवा किडनी. मला आयफोन घ्यायचा आहे लवकर. तो नवीन आलेला आयफोन 13Pro", असं म्हणत राखीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, राखीने स्वत: हा व्हिडीओ शूट केला आहे. राखी अनेकदा असे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. अलिकडेच तिने काऊचवर बसून काही हॉट पोझमधील फोटो शेअर केले होते. या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा रंगली होती.