Rakhi Sawant : 4 तास चालली राखी सावंतची सर्जरी, नेमकं झालं होतं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 17:48 IST2022-08-31T17:47:57+5:302022-08-31T17:48:25+5:30

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक व्हिडीओ पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. होय, राखीने सर्जरीआधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पण राखीला नेमकं काय झालं? कशाची सर्जरी? हे कळायला मार्ग नव्हता.

rakhi sawant admitted in hospital undergone surgery | Rakhi Sawant : 4 तास चालली राखी सावंतची सर्जरी, नेमकं झालं होतं तरी काय?

Rakhi Sawant : 4 तास चालली राखी सावंतची सर्जरी, नेमकं झालं होतं तरी काय?

काल मंगळवारी राखी सावंतचा (Rakhi Sawant  ) एक व्हिडीओ पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. होय, राखीने सर्जरीआधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत राखी रूग्णालयात डान्स करताना दिसली होती. तिच्या हाताला ड्रिप होती. पण राखीला नेमकं काय झालं? कशाची सर्जरी? हे कळायला मार्ग नव्हता. पण आता त्याचाही खुलासा झाला आहे.

खुद्द राखीने याबाबत माहिती दिली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बातचीत करताना तिने आपल्या आजाराबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, जुहूच्या क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये 4 तास माझी सर्जरी चालली. माझ्या पोटात गाठ होती. युटेरसच्या थोड्या वर. खूप आधीपासून मला ही गाठ काढायची होती. पण काही कारणास्तव सर्जरी लांबत गेली. या गाठीमुळे मला प्रचंड वेदना होत होत्या. अखेर मी ती काढण्याचा निर्णय घेतला, असं ती म्हणाली.
राखी आणखी दोन दिवस रूग्णालयात राहणार आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या तिचा बॉयफ्रेन्ड आदिल तिची काळजी घेतोय. तो पूर्णवेळ रूग्णालयात राखीजवळ होता.

सर्जरीआधी केला होता तुफान डान्स
काल राखीने सर्जरीआधीचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ती रूग्णालयाच्या रूममध्ये डान्स करताना दिसली होती. व्हिडीओत राखीच्या हाताला ड्रिप लागलेली होती आणि ड्रिपसोबतच ती धमाकेदार डान्स करताना दिसली होती. या व्हिडीओत तिला बॉयफ्रेन्ड आदिलही तिच्यासोबत  होता. ‘कुठल्याही परिस्थितीत डान्स मला सोडत नाही, सर्जरीआधीचा डान्स,’ असं व्हिडीओ शेअर करताना राखीने लिहिलं होतं. राखी सध्या दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. आदिल खान हा बिझनेसमॅन आहे आणि त्याचा कारचा बिझनेस आहे. त्यासोबतच त्याचे इतरही काही बिझनेस आहेत.  

Web Title: rakhi sawant admitted in hospital undergone surgery