राकेश शर्मा यांच्या बायोपिक आधी संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसू शकतो शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 11:04 IST2018-04-09T05:34:01+5:302018-04-09T11:04:01+5:30

शाहरुख खानने यावर्षी त्याच्या फॅन्सना निराशा न करण्याचा पक्क इरादा केल्याचा दिसतेय. सध्या शाहरुख त्याचा आगामी चित्रपट 'झिरो'ला घेऊन ...

Before the Rakeysh Sharma's biopic, Shah Rukh Khan could appear in Sanjay Leela Bhansali's film | राकेश शर्मा यांच्या बायोपिक आधी संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसू शकतो शाहरुख खान

राकेश शर्मा यांच्या बायोपिक आधी संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसू शकतो शाहरुख खान

हरुख खानने यावर्षी त्याच्या फॅन्सना निराशा न करण्याचा पक्क इरादा केल्याचा दिसतेय. सध्या शाहरुख त्याचा आगामी चित्रपट 'झिरो'ला घेऊन खूपच उत्साहित आहे. 'झिरो'ची शूटिंग शाहरुखने आधीच सुरु केली आहे या वर्षाच्या अखेरीस झिरो रिलीजदेखील होणार आहे.झिरोची शूटिंग संपल्यानंतर शाहरुख संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या कामाला लागणार असल्याचे समजतेय.  
मिड-डेच्या रिपोर्टनुसार शाहरुख खान राकेश शर्मा यांचा बायोपिक 'सैल्यूट'ची शूटिंग सुरु करण्याआधी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे. भन्साळींसोबत शाहरुखने 16 वर्षांआधी काम केले होते त्यानंतर पुन्हा एकदा दोघे एकत्र काम करण्यास तयार आहेत. 

मिड-डेच्या सूत्रांनुसार, खूप कमी लोकांना माहिती आहे कि शाहरुख आणि भन्साळी हे गेल्या अनेक दिवसांपासून एका प्रोजेक्टवर चर्चा करतायेत. नुकतीच दोघांची यासंदर्भात भेटसुद्धा झाली. संजय लीला भन्साळी यांनी आपली स्क्रिप्ट शाहरुखला सांगितली आहे. या चित्रपटाची कथा एक काल्पनिक प्रेमकथेवर आधारित आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी होकार दिल्यानंतर यातील अभिनेत्रीचा शोध सुरु  केला आहे. सूत्रांनी मिड-डे सांगितले की, जर सगळं ठरल्याप्रमाणे झाले तर शाहरुख झिरोनंतर भन्साळींच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. सैल्यूटचे शूटिंग शाहरुख पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून सुरु करणार असल्याचे समजतेय. 

‘झिरो’ चित्रपटात शाहरूखशिवाय कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये आहेत.यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. शाहरूखसाठी गतवर्षी कमालीचे अनलकी ठरले. ​ गतवर्षातील  त्याचा अखेरचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ही बॉक्स आॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकला नाही. 

Web Title: Before the Rakeysh Sharma's biopic, Shah Rukh Khan could appear in Sanjay Leela Bhansali's film