राकेश रोशन यांनी व्यक्त केली खंत; म्हणे,‘मित्र ऋषी कपूरने माझे ऐकले नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:30 IST2020-05-03T18:30:02+5:302020-05-03T18:30:49+5:30

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे.

Rakesh Roshan expressed grief; Says, 'Friend Rishi Kapoor didn't listen to me' | राकेश रोशन यांनी व्यक्त केली खंत; म्हणे,‘मित्र ऋषी कपूरने माझे ऐकले नाही’

राकेश रोशन यांनी व्यक्त केली खंत; म्हणे,‘मित्र ऋषी कपूरने माझे ऐकले नाही’

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. अजूनही त्यांचे मित्र, आप्तस्वकीय या दु:खातून सावरलेले नाहीत. ऋषी कपूर यांचे मित्र राकेश रोशन यांना एक वेगळीच खंत जाणवतेय. त्यांनी त्याचा नुकताच खुलासा केला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन आणि ऋषी कपूर यांची घट्ट मैत्री होती. ते दोघे एकमेकांना प्रत्येक गोष्ट शेअर करायचे. याबद्दलच एक खंत राकेश रोशन यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली. ती म्हणजे, दिल्ली येथे एक लग्न कार्यक्रम होता. तिथे ऋषी कपूर यांना जायचे होते. तेव्हा राकेश रोशन यांनी ऋषी कपूर यांना लग्नाला न जाण्याचा सल्ला दिला होता. कारण ते दोघेही कॅन्सरचे रूग्ण आहेत. त्यांना लवकर एखादे इन्फेक्शन होऊ शकते. पण, ऋषी यांनी राकेश रोशन यांचे ऐकले नाही. ते त्या लग्नाला गेले. तिथून आल्यानंतरच त्यांना त्रास होऊ लागला. 

राकेश रोशन हे जेव्हा त्यानंतर दवाखान्यात जाऊन ऋषी कपूर यांना भेटले. तेव्हा ऋषी यांनी त्या लग्नाला जायला नको होते, असे राकेश रोशन यांच्याजवळ कबूल केले होते. पण, आज ऋषी आपल्यात नाहीत. म्हणून राकेश रोशन यांना ही खंत जाणवतेय, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Rakesh Roshan expressed grief; Says, 'Friend Rishi Kapoor didn't listen to me'