या सुपरस्टारला पाहाण्यासाठी राजकुमार अनेक तास उभा राहिला होता त्याच्या घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 14:30 IST2019-11-03T14:30:00+5:302019-11-03T14:30:02+5:30

राजकुमार कोणत्या अभिनेत्याचा फॅन आहे हे देखील त्याने या कार्यक्रमात नुकतेच सांगितले.

Rajkummar Rao Used to Stand for Hours Outside Shah Rukh Khan's House Mannat | या सुपरस्टारला पाहाण्यासाठी राजकुमार अनेक तास उभा राहिला होता त्याच्या घराबाहेर

या सुपरस्टारला पाहाण्यासाठी राजकुमार अनेक तास उभा राहिला होता त्याच्या घराबाहेर

ठळक मुद्देराजकुमारने कार्यक्रमात सांगितले की, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. मी मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर मी सहा-सात तास शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या बाहेर उभा राहिलो होतो.

राजकुमार रावच्या मेड इन चायना या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली असून या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन त्याने खूप चांगल्याप्रकारे केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान दिलेल्या अनेक मुलाखतीत त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.



मेड इन चायना या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला होता. राजकुमारने नेहा धुपियाच्या फिल्टर नेहा या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीविषयी तसेच बॉलिवूडमधील त्याच्या प्रवासाविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या.  राजकुमार कोणत्या अभिनेत्याचा फॅन आहे हे देखील त्याने या कार्यक्रमात नुकतेच सांगितले.



राजकुमारने या कार्यक्रमात सांगितले की, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. मी मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर मी सहा-सात तास शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या बाहेर उभा राहिलो होतो. शाहरुखची एक तरी झलक मला पाहायला मिळावी अशी माझी इच्छा होती. अनेक तास उभे राहिल्यानंतर देखील मला शाहरुखला पाहायला न मिळाल्याने मला खूप वाईट वाटले होते. पण त्याची पत्नी गौरी खानची एक झलक पाहायला मिळाल्याने मी आनंदित झालो होतो. मी शाहरुख खानला सगळ्यात पहिल्यांदा चित्रीकरणाच्या निमित्ताने मेहबुब स्टुडिओत भेटलो. मी त्याला भेटलो त्यावेळी त्याला माझ्याविषयी सगळे काही माहीत होते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याच सगळ्या गोष्टी त्याला खास बनवतात असे मला वाटते. मी आज त्याला कधीही फोन, मेसेज करू शकतो. तो देखील मला अनेकवेळा फोन करतो. पण आजही मी त्याचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटल्यावर, त्याच्याशी फोनवर बोलताना मला तितकाच आनंद होतो.

Web Title: Rajkummar Rao Used to Stand for Hours Outside Shah Rukh Khan's House Mannat