"बॅगा पॅक करा आणि...", पत्नी पत्रलेखामुळं राजकुमार रावने कुकला नोकरीवरून काढलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:47 IST2025-05-23T16:08:37+5:302025-05-23T16:47:21+5:30
राजकुमार रावने कुकला काढलं होतं नोकरीवरुन, पत्नी पत्रलेखा ठरली होती कारण

"बॅगा पॅक करा आणि...", पत्नी पत्रलेखामुळं राजकुमार रावने कुकला नोकरीवरून काढलं होतं
अभिनेता राजकुमार राव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही 'गॉडफादर' नसताना त्याने आपली मेहनत आणि अभियन कौशल्याच्या बळावर प्रसिद्धी मिळवली आहे. राजकुमार राव याने अभिनयातील विविध पैलू दाखवत प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. हेच कारण आहे की, त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. व्यावसायिकासोबतच राजकुमारचं वैयक्तिक आयुष्यही खूप
चर्चेत असतं. नुकतंच एका मुलाखतीमध्ये राजकुमार रावनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक अनुभव शेअर केला. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
नुकतंच राजकुमार हा रौनक राजानीच्या कॉमेडी शोमध्ये पोहचला होता. यावेळी गप्पा मारताना रौनक राजानीनं त्याच्या घरातील कुकबद्दल सांगितलं. रौनक राजानी याच्या पत्नीच्या बोलण्याकडे त्यांचा कुक दुर्लक्ष करायचा. पण, त्याला काढण्याचे धाडस झालं नसल्याचं रौनक राजानीनं सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना राजकुमारने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अनुभव शेअर केला.
राजकुमारने त्याच्या घरातील कुकविषयी एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "आमच्याकडे एक कुक होता, जवळपास ४८ वर्षांचा असेल. तो अप्रतिम स्वयंपाक करायचाय. विशेषतः मॅक्सिकन जेवण. पण काही दिवसांनंतर पत्रलेखा मला सांगितलं की तो तिच्याशी नीट बोलत नाही. काही विचारलं तर तो तिला योग्य उत्तर देत नव्हता. दुसरीकडे तो माझ्याशी मात्र खूप आदराने बोलायचा. तेव्हा मला जाणवलं की काहीतरी खरंच चुकीचं आहे. यानंतर तीन दिवसांनी पत्रलेखानं त्याला काही विचारलं, तर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. मला हे कळाल्यानंतर मी त्याला फोन केला आणि बॅगा पॅक करून निघून जाण्यास सांगितलं".
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न २०२१ मध्ये झालं होतं. हे जोडपे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानलं जातं. राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, राजकुमार राव सध्या त्याच्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाचे प्रमोशन करतोय. ज्यामध्ये वामिका गब्बी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण शर्मा यांनी केले आहे आणि त्यांनीच कथा लिहिली आहे. हा चित्रपट दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाले आहेत. हा चित्रपट थिएटरनंतर अमेझॉन प्राइम व्हिडिओमध्येही प्रदर्शित होणार आहे.