राजकुमार राव व भूमी पेडणेकर का म्हणताहेत 'बधाई दो', जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:50 IST2020-03-09T17:49:36+5:302020-03-09T17:50:09+5:30

भूमी पेडणेकर व राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Rajkummar Rao & Bhumi Pednekar To Star In The Badhai Ho Sequel, 'Badhai Do' tjl | राजकुमार राव व भूमी पेडणेकर का म्हणताहेत 'बधाई दो', जाणून घ्या याबद्दल

राजकुमार राव व भूमी पेडणेकर का म्हणताहेत 'बधाई दो', जाणून घ्या याबद्दल

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'बधाई हो' सिनेमाच्या घवघवीत यशानंतर जंगली पिक्चर्स या सिनेमाचा सिक्वल घेऊन येत आहेत. 'बधाई दो' असं या सिनेमाचं नाव असून राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर या सिनेमातून प्रेक्षकांना बधाई देताना दिसणार आहेत.


बधाई दो या सिनेमात राजकुमार राव एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. एक असा पोलीस अधिकारी ज्याची ड्यूटी महिला पोलिस ठाण्यात लागते. भूमी या सिनेमात पीटी शिक्षिका दाखवण्यात आली आहे. भूमी पेडणेकर व राजकुमार राव पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे.


'बधाई हो' सिनेमाचा लेखक अक्षत घिल्डियाल हा सुमन अधिकारीच्या मदतीने 'बधाई दो' सिनेमाचे संवांद लिहिणार असून 'हंटर' सिनेमाचा दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

जूनमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूमी पेडणेकर व राजकुमार राव या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Rajkummar Rao & Bhumi Pednekar To Star In The Badhai Ho Sequel, 'Badhai Do' tjl