राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ची ऐतिहासीक कामगिरी! 'असा' विक्रम करणारा पहिला हिंदी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:48 IST2024-09-18T13:45:31+5:302024-09-18T13:48:51+5:30

राजकुमार रावच्या 'स्त्री २' सिनेमाने नवा इतिहास रचला. त्यामुळे सर्वच स्तरांकडून सिनेमाचं कौतुक होतंय (stree 2)

Rajkumar Rao shraddha kapoor stree 2 movie is highest grossing hindi film beat shahrukh khan jawan movie | राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ची ऐतिहासीक कामगिरी! 'असा' विक्रम करणारा पहिला हिंदी सिनेमा

राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ची ऐतिहासीक कामगिरी! 'असा' विक्रम करणारा पहिला हिंदी सिनेमा

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' सिनेमा सर्वांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. 'ओ स्त्री कल आना', 'ओ स्त्री रक्षा करना' अशा टॅगलाईनमुळे फेमस झालेला 'स्त्री २' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा आहे. पहिल्या दिवसापासूनच 'स्त्री २'च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच 'स्त्री २'च्या नावावर नवीन रेकॉर्ड नोंदवला गेलाय. राजकुमार-श्रद्धाच्या 'स्त्री २'ने असा कोणता विक्रम केलाय हे आम्ही तुम्हाला सांगतो.

'स्त्री २'चा ऐतिहासीक विक्रम

राजकुमार राव-श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज झाला होता. सलग येणारी सुट्टी आणि माऊथ पब्लिसिटीच्या जोारावर 'स्त्री २'ने ऐतिहासीक कमाई केली आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार 'स्त्री २'ने सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा म्हणून नवीन विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. याआधी या यादीत शाहरुख खानचा 'जवान' सिनेमा टॉपला होता. आता 'स्त्री २'ने जवानला मागे टाकत सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी सिनेमा म्हणून स्वतःची ओळख कमावली आहे.


'स्त्री २' चा कमाईचा आकडा बघून थक्क व्हाल

मॅडॉक फिल्मस् ची निर्मिती असलेल्या 'स्त्री २' रिलीज होऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरीही हा सिनेमा पाहण्यासाठी लोक सिनेमागृहात जात आहेत. 'स्त्री २'ने भारतात ५८६ कोटींची कमाई केलीय. 'स्त्री २' शाहरुखच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवानला मात दिली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नंबर १ कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये 'स्त्री २' वरच्या स्थानावर पोहोचला आहे. या विक्रमामुळे सिनेमाची टीम नक्कीच आनंदी असेल यात शंका नाही.

Web Title: Rajkumar Rao shraddha kapoor stree 2 movie is highest grossing hindi film beat shahrukh khan jawan movie