रजनीकांत अभिनयातून घेणार संन्यास?, 'हा' सिनेमा ठरू शकतो शेवटचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:19 PM2023-05-18T18:19:26+5:302023-05-18T18:20:03+5:30

Rajinikanth : प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या आगामी चित्रपटात रजनीकांत झळकणार आहेत

Rajinikanth to retire from acting?, 'Ha' may be the last film; Famous director's statement in discussion | रजनीकांत अभिनयातून घेणार संन्यास?, 'हा' सिनेमा ठरू शकतो शेवटचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत

रजनीकांत अभिनयातून घेणार संन्यास?, 'हा' सिनेमा ठरू शकतो शेवटचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत

googlenewsNext

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये नेहमीच पहायला मिळतो. रजनीकांत यांचे सिनेमे रिलीजपूर्वीच हिट होतात. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण भारतात त्यांचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. दरम्यान रजनीकांत यांच्याबद्दल अशाच काही बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. लोकेश कनगराजसोबत रजनीकांत ज्या चित्रपटात काम करत आहेत तो कदाचित त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो.

नुकतेच प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक मिस्किन यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. रजनीकांत त्यांच्या १७१व्या चित्रपटासाठी विक्रम चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबत दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो असे त्यांनी म्हटले. याची पुष्टी झालेली नसली तरी. त्यांनी सांगितले होते की, रजनीकांत यांनी स्वतः लोकेश यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्याच्यासोबत काम करण्यात रस दाखवला होता. विक्रमसारखा चित्रपट बनवणाऱ्या आणि लिओ बनवणाऱ्या लोकेश कनागराजसोबत रजनीकांतची जुगलबंदी पाहण्यासारखी असेल.

रजनीकांत यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर त्यात जेलर आणि लाल सलाम यांचा समावेश आहे. नेल्सन जेलरचे दिग्दर्शन करत असून रजनीकांतसोबत शिवा राजकुमार, तमन्ना आणि राम्या कृष्णन दिसणार आहेत. तर लाल सलाममध्ये रजनीकांत यांचा कॅमिओ आहे. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत जवळपास पाच दशके झाली आहेत.

Web Title: Rajinikanth to retire from acting?, 'Ha' may be the last film; Famous director's statement in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.