'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 11:39 IST2020-01-29T11:39:06+5:302020-01-29T11:39:58+5:30

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाल्याचे समजते आहे.

Rajinikanth suffered injuries during the shooting of 'Man Versus Wild'. | 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत बेयर ग्रिल्स शोमध्ये दिसले होते. डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या शोचे शूटिंग रजनीकांत व ग्रिल्स यांनी मंगळवारी कर्नाटकमधील बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये सुरू केले आहे. आता अशी माहिती मिळते आहे की शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाली आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, शूटिंगमध्ये रजनीकांत यांना थोडीफार दुखापत झाली आहे. रजनीकांत व बेयर ग्रिल्स कर्नाटकमधील बांदीपुर वाघ अभयारण्यात शूटिंग करत होते. रजनीकांत यांच्या दुखापतीबद्दल एका वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, रजनीकांत यांचे संतुलन बिघडले आणि त्यांच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यांच्या हाताला व कोपरालाही थोडेसे खरचटले.
त्यांनी सांगितले की, जास्त खरचटले नाही आणि लवकरच ते ठीक होतील. 




मॅन व्हर्सेज वाइल्डच्या शूटिंगसाठी रजनीकांत व बेयर ग्रिल्स आता मैसूर येथे रवाना झाले आहेत. रजनीकांत यांच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्यानंतर अक्षय कुमार या शोसाठी शूट करणार आहे. मेन्स व्हर्सेस वाइल्डचा रजनीकांतचा हा एपिसोड कधी प्रसारित केला जाणार याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकली नाही. आता खुद्द रजनीकांत या धाडसी कार्यक्रमात दिसणार असल्याने त्याला प्रतिसाद कसा मिळेल हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Rajinikanth suffered injuries during the shooting of 'Man Versus Wild'.