​ तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांना भेटले रजनीकांत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 14:28 IST2017-05-15T08:58:45+5:302017-05-15T14:28:45+5:30

तब्बल आठ वर्षानंतर...होय,सुमारे आठ वर्षांनंतर  रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटतो आहे. आज सोमवारपासून सलग चार दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटणार ...

Rajinikanth met the fans after eight years ...! | ​ तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांना भेटले रजनीकांत...!

​ तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांना भेटले रजनीकांत...!

्बल आठ वर्षानंतर...होय,सुमारे आठ वर्षांनंतर  रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटतो आहे. आज सोमवारपासून सलग चार दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे. आज सकाळपासून आपल्या या लाडक्या अभिनेत्याला भेटायला चाहत्यांनी एकच गर्दी केली. रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहत्यांच्या रांगा लागल्या. आज पहिल्या दिवशी रजनीकांतने आपल्या चाहत्यांना संबोधित केले. यावेळी तो बराच भावूक झालेला दिसला. एक ‘राज की बात’ इथे सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे, रजनीकांत आपल्या कुठल्याही चाहत्यांशी संवाद साधणार नाही. केवळ त्यांच्यासोबत फोटो क्लिक करेल. २००९ मध्ये रजनीकांत अखेरचे ‘शिवाजी: द बॉस’च्या रिलीजनंतर आपल्या चाहत्यांना भेटला होता. खरे तर रजनीकांतच्या वाढदिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्याने चाहत्यांना असे प्रत्यक्ष भेटणे बंद केले होते.



चेन्नईत आज आपल्या चाहत्यांना संबोधित करताना रजनीकांतने अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत. २१ वर्षांपूर्वी राजकीय आघाडीला पाठींबा देऊन मी खूप मोठी चूक केली होती. मी राजकारणात आलोच तर प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक करेल. चुकीची पुनरावृत्ती न करता,चुकीच्या लोकांसोबत स्वत:चे नाव पुन्हा जुळू नये, याबाबत मी दक्ष असेल, असे तो म्हणाला.



ALSO READ : -​ तर परिणाम भोगावे लागतील; रजनीकांत यांना मिळाली धमकी!!

यावर्षी रजनीकांत यांचा ‘2.0’ हा सिनेमा येतो आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सुद्धा स्क्रिन शेअर करताना दिसेल. अक्षय यात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. काल-परवापासून रजनीकांत यांचा ‘गॉडफादर’ हा आगामी सिनेमा चर्चेत आला आहे. हा चित्रपट कुख्यात डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर बेतलेला आहे.  चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटावरून रजनीकांत यांना धमकी मिळाली आहे. कुख्यात डॉन हाजी मस्तानचा मानसपुत्र असलेल्या सुंदर शेखर याने रजनीकांत यांना धमकी दिली आहे. हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवा, पण यात त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुंदरने दिला आहे.  

Web Title: Rajinikanth met the fans after eight years ...!