चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शिंपडलं बकऱ्याचं रक्त, भडकले रजनीकांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 14:15 IST2021-09-15T14:13:54+5:302021-09-15T14:15:55+5:30

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत सध्या जाम भडकले आहेत. कारणही तसेच आहे. चाहत्यांनी असं काही केलं की, रजनीकांत यांचा पारा चढला.

Rajinikanth gets Angry for sprinkling goats blood on the film Annaatthe poster | चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शिंपडलं बकऱ्याचं रक्त, भडकले रजनीकांत

चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शिंपडलं बकऱ्याचं रक्त, भडकले रजनीकांत

ठळक मुद्देआपल्या प्रेमाखातर चाहत्यांनी एका मुक्या जीवाचा बळी घ्यावा, हा क्रूर प्रकार रजनीकांत यांना आवडला नाही.

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत सध्या जाम भडकले आहेत. कारणही तसेच आहे. चाहत्यांनी असं काही केलं की, रजनीकांत यांचा पारा चढला. मग काय, त्यांनी चाहत्यांना चांगलंच फैलावर घेत आपला संताप व्यक्त केला.
रजनीकांत हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. साऊथचे लोक त्यांना अगदी देवासारखे पुजतात. त्यांचा एखादा नवा सिनेमा रिलीज होणार म्हटलं की, चाहते त्याच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालतात. ढोलताशे लावून मिरवणूक काढतात. इथपर्यंत ठीक होतं. पण यावेळी चाहत्यांनी जे काही केलं, ते पाहून खुद्द रजनीकांतही यांनाही राग अनावर झाला.

चाहत्यांनी असं काय केलं? तर रजनीकांत (Rajinikanth ) यांच्या ‘अन्नाथे’ या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज होताच, बक-याचा बळी दिला. इतकंच नाही तर या बक-याच्या रक्तानं रजनीकांत यांच्या पोस्टरला अभिषेक घातला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात कथितरित्या रजनीकांत यांचे चाहते बक-याचा बळी दिल्यानंतर त्याचं रक्त रजनीकांत यांच्या पोस्टवर शिंपडतांना दिसताहेत.
चाहत्यांचं हे कृत्य पाहून रजनीकांत यांचाही राग अनावर झाला. त्यांनी याबाबत जाहीर संताप व्यक्त केला.

अन् रजनीकांत भडकले...
आपल्या प्रेमाखातर चाहत्यांनी एका मुक्या जीवाचा बळी घ्यावा, हा क्रूर प्रकार रजनीकांत यांना आवडला नाही. अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरम (फॅन्स क्लब)चे पदाधिकारी व रजनीकांत यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे व्ही. एम. सुधाकर यांनी या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. ही घृणास्पद घटना असून याचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. रजनीकांत यांनीही या घटनेची निंदा केली आहे.
 

Web Title: Rajinikanth gets Angry for sprinkling goats blood on the film Annaatthe poster