कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 13:53 IST2019-01-11T13:50:16+5:302019-01-11T13:53:03+5:30

काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता.

Rajinikanth and Ajith Kumar fans go crazy | कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता. मग काय, या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. चाहते आपल्या आवडत्या स्टार्सचा चित्रपट पाहण्यासाठी बेभान झाले होते. या अशा बेभान झालेल्या चाहत्यांपैकी कुणी चक्क अजित कुमारच्या भल्यामोठ्या कटआऊटला दुधाचा अभिषेक घालून स्वत:ला जखमी करून घेतले. तर एका चाहत्याने थेट ‘पेट्टा’च्या पोस्टरसमोर लग्न लावले. केवळ इतकेच नाही तर ‘पेट्टा’ पाहायला आलेल्या प्रेक्षकांना लग्नाची मेजवानीही दिली.
काही चाहत्यांनी चक्क चालत्या ट्रकवर आतिषबाजी केली. थिएटरबाहेर ‘पोंगल’ साजरा केला. अनेक चाहते थिएटरबाहेर नाचतांना दिसले. या क्रेजी फॅन्सचा क्रेजी अंदाज तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा...










 

 

Web Title: Rajinikanth and Ajith Kumar fans go crazy