'ती दारु पित असेल, अशी अभिनेत्री...", राज कुंद्राच्या वडिलांचा शिल्पा शेट्टीला होता विरोध, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:29 IST2025-09-06T10:27:12+5:302025-09-06T10:29:44+5:30

राज कुंद्रा शिल्पासोबत रिलेशनशिपमध्ये असताना...

raj kundra reveals his parents was against his relationship with shilpa shetty | 'ती दारु पित असेल, अशी अभिनेत्री...", राज कुंद्राच्या वडिलांचा शिल्पा शेट्टीला होता विरोध, नंतर...

'ती दारु पित असेल, अशी अभिनेत्री...", राज कुंद्राच्या वडिलांचा शिल्पा शेट्टीला होता विरोध, नंतर...

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) नेहमीच चर्चेत असलेलं कपल. नुकतंच हे कपल एका फ्रॉड केसमध्येही चर्चेत आलं आहे.  २००९ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या संसाराला १६ वर्ष झाली आहेत. राज कुंद्रा आगामी 'मेहर' सिनेमात दिसणार आहे. तर शिल्पा आणि राज यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. फराह खानच्या व्लॉगमध्ये नुकतेच दोघंही दिसले. यावेळी शिल्पाबद्दल राजच्या वडिलांची  पहिली प्रतिक्रिया काय होती हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.

फराह खानच्या व्लॉगमध्ये शिल्पा आणि राज यांनी त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली ते सांगितलं. तसंच किती चढ उतार आले यावरही भाष्य केलं. तेव्हा राज कुंद्रा म्हणाला की त्याचे आईवडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. 'माझ्या वडिलांना कळलं होतं की मी एका अभिनेत्रीला डेट करत आहे. तर सुरुवातीला ते खूश होते. पण जेव्हा लग्नाची गोष्ट आली तेव्हा ते परेशान झाले. त्यांना वाटलं ती अभिनेत्री आहे म्हणजे दारु पीत असेल, सिगरेट ओढत. पण मग मी त्यांना समजावलं की शिल्पाबद्दल काहीही विचार करायच्या आधी तुम्ही तिला एकदा भेटा आणि मगच निर्णय घ्या."

"नंतर जेव्हा आईवडिलांची शिल्पाशी छान ओळख झाली त्यानंतर मीच साईडलाईन झालो. माझे आईवडील फक्त तिच्याशीच बोलायचे. त्यांचं माझ्यापेक्षा तिच्यावरच जास्त प्रेम होतं.", असं तो म्हणाला. राज कुंद्राने आता अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्याचा 'मेहर' सिनेमा रिलीज होत आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत गीता बसरा मुख्य भूमिकेत आहे.

दरम्यान शिल्पा आणि राज यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तब्बल ६०. ४८ कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. हे प्रकरण त्यांच्या बंद पडलेल्या Best Deal TV Pvt Ltd या ऑनलाइन शॉपिंग कंपनीशी संबंधित आहे. तक्रारदार दीपक कोठारी हे मुंबईतील व्यावसायिक असून Lotus Capital Financial Services या कंपनीचे संचालक आहेत.

Web Title: raj kundra reveals his parents was against his relationship with shilpa shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.