ती असे काम करूच शकत नाही...!  ‘हंगामा 2’च्या निर्मात्याचा शिल्पा शेट्टीला ‘फुल्ल सपोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:36 IST2021-07-29T12:35:10+5:302021-07-29T12:36:28+5:30

Raj Kundra case : राज कुंद्रा प्रकरणामुळे शिल्पाच्या ‘हंगामा 2’ या चित्रपटावर काय परिणाम होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘हंगामा 2’ च्या निर्मात्यांनी याबाबत आपले मतं मांडले.

Raj Kundra case Shilpa Shetty will never do wrong, says producer Ratan Jain | ती असे काम करूच शकत नाही...!  ‘हंगामा 2’च्या निर्मात्याचा शिल्पा शेट्टीला ‘फुल्ल सपोर्ट’

ती असे काम करूच शकत नाही...!  ‘हंगामा 2’च्या निर्मात्याचा शिल्पा शेट्टीला ‘फुल्ल सपोर्ट’

ठळक मुद्दे‘हंगामा 2’ या चित्रपटापूर्वी रतन यांच्या धडकन आणि  हथियार या चित्रपटात शिल्पाने काम केले होते. हे दोन्ही सिनेमे हिट होते.

शिल्पा शेट्टी  (Shilpa Shetty) 14 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होती. ‘हंगामा 2’ हा तिचा धमाकेदार सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याआधीच शिल्पाचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली. मग काय? ‘हंगामा 2’ राहिला बाजूला राहिला अन् वेगळाच ‘हंगामा’ झाला. राजच्या अटकेनंतर शिल्पा घरातून बाहेरच पडलेली आहे. आता तर तिच्या ‘हंगामा 2’  (Hungama 2) या कमबॅक चित्रपटावर  आणि एकंदर तिच्या करिअरवरही राज कुंद्रा प्रकरणाचा वाईट परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अर्थात ‘हंगामा 2’चे निर्माते रतन जैन (Hungama 2 producer Ratan Jain) यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.  ती असे काम करु शकत नाही, असे म्हणत त्यांनी शिल्पाला पाठींबा दिला आहे.

नुकतीच रतन यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना शिल्पाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी शिल्पाची बाजू उचलून धरली. ‘मी शिल्पाला आजचा नाही तर अनेक वर्षांपासून ओळखतो. ती अशा काही प्रकरणात सामील असेल असे मला वाटत नाही. शिल्पाला तिच्या नव-याच्या बिझनेसविषयी माहितीच नव्हते, असा दावा मी करू शकत नाही. पण शिल्पा मात्र असे काम करु शकत नाही.  या प्रकरणामध्ये शिल्पा सहभागी असेल, असे मला अजिबात वाटत नाही. पण आता हा निर्णय तपास यंत्रणांना घेऊ दिला पाहिजे,’ असे ते म्हणाले. 

‘हंगामा 2’ या चित्रपटापूर्वी रतन यांच्या धडकन आणि  हथियार या चित्रपटात शिल्पाने काम केले होते. हे दोन्ही सिनेमे हिट होते.  
गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली. याच प्रकरणी  शिल्पाचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकारी राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते, तेव्हा राजला पाहून शिल्पा कोसळली होती. तिला अश्रू अनावर झाले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्राइम ब्रँचचे अधिकारी जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला बघून रागाने ओरडली होती.  या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत.  हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली? , असे ती रडत रडत राजला म्हणाली होती.

Web Title: Raj Kundra case Shilpa Shetty will never do wrong, says producer Ratan Jain