माझं काम कपडे उतरवणं नाही; स्टँड अप कॉमेडी करताना राज कुंद्रांनी मौन सोडलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:21 AM2023-10-05T09:21:24+5:302023-10-05T13:40:32+5:30

राज कुंद्रा नुकताच एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता. इथेही तो मास्क घालून आला होता.

Raj Kundra breaks his silence on allegations took part in stand up comedy and trolled himself | माझं काम कपडे उतरवणं नाही; स्टँड अप कॉमेडी करताना राज कुंद्रांनी मौन सोडलं, म्हणाले...

माझं काम कपडे उतरवणं नाही; स्टँड अप कॉमेडी करताना राज कुंद्रांनी मौन सोडलं, म्हणाले...

googlenewsNext

पॉर्नोग्राफी केसप्रकरणी अडचणीत आलेला राज कुंद्रा (Raj Kundra) तेव्हापासून सगळीकडेच मास्क घालूनच फिरताना दिसतो. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला बऱ्याच टीकांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळेच त्याच्यावर मास्क घालून फिरण्याची वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असतात. मास्क मॅन म्हणून त्याला संबोधलं जातं. तर आता या सर्व प्रकरणावर स्वत: राज कुंद्राने समोर येत भाष्य केलं आहे. 

राज कुंद्रा नुकताच एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने स्टेजवर कॉमेडी परफॉर्मन्स दिला. परफॉर्मन्सची सुरुवात करताना तो म्हणाला, 'शो सुरु करण्याआधी दोन गोष्टी. ज्यांना लैंगिक जोक्स ऐकायचे नसतील त्यांनी आताच १० मिनिटांसाठी बाहेर जावं. (कोणीच जात नाही) किती घाणेरडे प्रेक्षक आहात. मित्रांनो मी राज कुंद्रा म्हणजेच मास्क मॅन आणि शिल्पा शेट्टीचा पती. तसंच गरिबांचा केन वेस्ट. मी १८ वर्षांचा असताना लंडनमध्ये टॅक्सी चालवायचो.२१ वर्षांचा होईपर्यंत पश्मिना शॉलचं मोठं एम्पायर उभं केलं. माझं काम नेहमीच कपडे घालणं होतं उतरवणं नाही.'

'स्टँडअप टाईम' असं कॅप्शन देत राज कुंद्राने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच त्याने वादग्रस्त कॉमेडिअन मुन्नावर फारुकीचेही आभार मानले आहेत. राज कुंद्राचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक जोरजोरात हसले आणि टाळ्या वाजवल्या. तो या शोमध्येही हटके मास्क घालून आला होता. त्याचा चेहरा तर दिसला नाही मात्र त्याने आपल्या कॉमेडी सर्वांनाच हसवलं. स्वत:लाच ट्रोल करत त्याने शो गाजवला. 'काम ऐसा करो की लाखो लोगो से मूँह छुपाना पडे' अशी कमेंट करत नेटकऱ्याने त्याच्यावर टीका केली आहे.  सध्या राज कुंद्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Web Title: Raj Kundra breaks his silence on allegations took part in stand up comedy and trolled himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.