सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच 'या' कलाकारांचंही झालं हृदयविकारामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:45 PM2021-09-02T15:45:32+5:302021-09-02T15:48:39+5:30

Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच कलाविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांचंही निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळेच झालं आहे.

raj kaushal these 6 celebrities also died due to heart attack | सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच 'या' कलाकारांचंही झालं हृदयविकारामुळे निधन

सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच 'या' कलाकारांचंही झालं हृदयविकारामुळे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देबॉलिवूडमधील अनेक कलाकारांचं हृदयविकारामुळे निधन झालं आहे

गेल्या दोन वर्षांमध्ये कलाविश्वात अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. यात अनेक लोकप्रिय कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. अलिकडेच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं राज कौशलचं निधन झालं.  राजच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली होती. त्या दु:खातून कलाकार सावरत नाही तर त्यातच आता प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कलाविश्वात असे असंख्य कालाकार आहेत ज्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळेच हे कलाकार कोणते ते पाहुयात.
राजीव कपूर -
दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर यांचं वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ९ फेब्रुवारी रोजी चेंबूरमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरोज खान -
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच कार्डिअॅक अरेस्टमुळे ३ जुलै २०२० रोजी निधन झालं. १७ जून २०२० रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.त्यामुळे त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदर कुमार -
वॉण्टेड या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत झळकलेला अभिनेता इंदर कुमार यांचंदेखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो केवळ ४३ वर्षांचा होता.

संजीव कुमार - 
सुप्रसिद्ध संजीव कुमार यांचं वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ६ नोव्हेंबर १९५८ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोर कुमार-
बॉलिवूडवर एकेकाळी राज्य करणाऱ्या किशोर कुमार यांचं निधन १३ ऑक्टोबर १९८७ मध्ये झालं.
देवानंद-
बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवानंद यांनी ३ डिसेंबर २०११ रोजी अखेरचा श्वास घेतला. देवानंद वैद्यकीय तपासणीसाठी लंडनला गेले असता तेथेच त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतं.
 

Web Title: raj kaushal these 6 celebrities also died due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.