ऋषी कपूर यांनी उघड केलीत पप्पा राज कपूर यांचे ‘राज’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 12:40 PM2017-01-17T12:40:40+5:302017-01-17T12:40:40+5:30

ऋषी कपूर यांच्या बायोग्राफीचे नाव ‘खुल्लम खुल्ला-ऋषी कपूर अनसेंसर्ड’ आहे. नेमक्या या नावाला न्याय देत,ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीत ...

Raj Kapoor's 'Raj' was released by Rishi Kapoor | ऋषी कपूर यांनी उघड केलीत पप्पा राज कपूर यांचे ‘राज’!

ऋषी कपूर यांनी उघड केलीत पप्पा राज कपूर यांचे ‘राज’!

googlenewsNext
ी कपूर यांच्या बायोग्राफीचे नाव ‘खुल्लम खुल्ला-ऋषी कपूर अनसेंसर्ड’ आहे. नेमक्या या नावाला न्याय देत,ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीत काही धक्कादायक खुलासे केले आहे. निश्चितपणे जे ‘खुल्लम खुल्ला’ सांगता येणार नाही, ते ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये सांगितले आहे. होय, आपल्या वडिलांचे म्हणजे राज कपूर यांचे काही ‘राज’ उघड करायलाही ऋषी कपूर कचरले नाहीत.

                                    

राज कपूर यांना हिंदी सिनेमाचे ‘शो मॅन’ म्हटले जाते. ऋषी कपूर यांनी आपल्या आयुष्याचे काही असेच पत्ते उघड केले आहेत. राज कपूर यांचे त्यांच्या लीडिंग लेडीजसोबतचे अफेअर्स त्यापैकीच एक़ राज कपूर आणि नर्गिस यांच्या गाजलेल्या अफेअरने ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीची सुरुवात केली आहे.  ते लिहितात, माझे वडील राज कपूर २८ वर्षांचे होते आणि हिंदी सिनेसृष्टीतील ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्याचवेळी ते प्रेमातही होते. दुर्दैवाने माझ्या आईऐवजी अन्य एका स्त्रीच्या. त्यांची गर्लफ्रेन्ड त्यांच्याच ‘आग’, ‘बरसात’,‘आवारा’ या काही हिट्स सिनेमात त्यांची हिरोईन होती. आता ही हिरोईन कोण? हे तुम्हाला सांगायला नकोच.

                                          

वैजयंतीमालाने राज कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना नेहमीच नकार दिला. पण ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये यावरही ‘खुल्लम खुल्ला’ लिहिले आहे. ‘मला चांगलं आठवतं की, पापा वैजयंतीमालासोबत रिलेशनशिपमध्ये होते. या कारणामुळे मी मम्मीसोबत मरीन ड्राईव्हच्या नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झालो होतो. हॉटेलमधून आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूट अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो होतो. पप्पांनी मॉम व आमच्यासाठी हे अपार्टमेंट खरेदी केले होते. वैजयंतीमाला यांनी राज कपूसोबतचे आपले अफेअर मॅन्युफेक्चर्ड असल्याचे म्हटले होते. त्यावेळी पप्पा जिवंत असते तर वैजयंतीमाला असे म्हणूच शकल्या नसत्या. पप्पांचे मद्य, सिनेमा आणि लीडिंग लेडीजवर प्रेम होते. माझे व पप्पांचे नाते अगदी तसेच होते, जे आज माझे व रणबीरचे आहे. पित्याबद्दलची भीती संपल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत गेला. विशेषत: तेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करू लागलो. नर्गिसजीनंतर मी त्यांच्यासोबत सर्वाधिक काम केले, असेही ऋषी कपूर यांनी लिहिले आहे.

Web Title: Raj Kapoor's 'Raj' was released by Rishi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.