"मै पूरी महाभारत हू!" अजय देवगणच्या 'रेड २'चा टीझर, रितेश देशमुखने रंगवलेल्या 'दादाभाई'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:16 IST2025-03-28T12:16:22+5:302025-03-28T12:16:45+5:30

अजय देवगणच्या आगामी 'रेड २'चा टीझर भेटीला आला आहे. या टीझरमध्ये रितेश देशमुखने लाईमलाईट लुटली आहे

raid 2 teaser starring ajay devgn riteish deshmukh saurabh shukla | "मै पूरी महाभारत हू!" अजय देवगणच्या 'रेड २'चा टीझर, रितेश देशमुखने रंगवलेल्या 'दादाभाई'ची चर्चा

"मै पूरी महाभारत हू!" अजय देवगणच्या 'रेड २'चा टीझर, रितेश देशमुखने रंगवलेल्या 'दादाभाई'ची चर्चा

सध्या मनोरंजन विश्वात आगामी सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे म्हणजे 'रेड २'. २०१८ साली 'रेड' सिनेमा रिलीज झाला होता. आता सहा वर्षांनी 'रेड' सिनेमाचा सीक्वल अर्थात 'रेड २' (raid 2) रिलीज होणार आहे. अशातच नुकतंच 'रेड २'चा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये अजय देवगण (ajay devgn) पुन्हा एकदा ऑफिसर अमेय पटनायकाच्या भूमिकेतून समोर येणार आहे. या टीझरमध्ये अभिनेता रितेश देशमुखने (riteish deshmukh) खलनायकाच्या भूमिकेत सर्वांचं लक्ष वेधलंय.

'रेड २'चा टीझर

'रेड २'चा टीझरमध्ये सुरुवातीला डोंगरावर एक बाईक दिसते. अशातच ग्रामीण भागात रेड मारायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या दिसतात. यापैकी एका गाडीत अजय देवगण बसलेला असतो. पुन्हा एकदा अमेय पटनायकाच्या भूमिकेत अजय देवगण भ्रष्ट व्यक्तींच्या घरावर छापा टाकायला सज्ज असतो. अशातच 'रेड'च्या पहिल्या भागात अमेयने ज्याला गजाआड केलेलं असतं तो रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) दिसतो. आता अमेय पटनायक त्याच्या कारकीर्दीतील ७५ वी रेड मारायला सज्ज असतो. यासाठी त्याची दादाभाईशी गाठ पडते.

पुढे 'रेड २'च्या टीझरमध्ये शेवटी दादाभाई आणि अमेय पटनायक यांच्यातील शा‍ब्दिक चकमक दिसते. "मै पूरी महाभारत हू", असं अमेय पटनायक दादाभाईला बोलताना दिसतो. एकूणच अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या अभिनयाची जुगलबंदी 'रेड २'मध्ये बघायला मिळणार आहे. या दोघांशिवाय सिनेमात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

Web Title: raid 2 teaser starring ajay devgn riteish deshmukh saurabh shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.