अभिनेता राहुल देव याच्या वडिलांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:10 IST2019-04-22T15:52:29+5:302019-04-22T16:10:10+5:30

लोकप्रिय मॉडेल व अभिनेता राहुल देव याच्या वडिलांचे वयाच्या ९१ वर्षी निधन झाले. राहुलने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत, सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली.

rahul dev father died actor shared heartfelt post on social media | अभिनेता राहुल देव याच्या वडिलांचे निधन

अभिनेता राहुल देव याच्या वडिलांचे निधन

ठळक मुद्देराहुल देव हे टीव्ही व चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव आहे. हिंदीशिवाय बंगाली, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केले आहे.

लोकप्रिय मॉडेल व अभिनेता राहुल देव याचे वडिल हरी देव यांचे  वयाच्या ९१ वर्षी निधन झाले. राहुलने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत, सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. ही बातमी शेअर करताना तो भावूक झालेला दिसला. ‘ तुमची नेहमी आठवण येईल, पापा. पाच दिवसांपूर्वी ते आम्हाला सोडून गेलेत. त्यांनी ९१ वर्षांची शानदार इनिंग खेळली. नव्वदीतील पापांसोबतचा हा एक यादगार क्षण. एक पोलिस अधिकारी आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित, एक उत्तम व्यक्तिमत्त्व, दयाळू व्यक्ति. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. खूप सारे पे्रम...’, असे राहुलने वडिलांबद्दल लिहिले. राहुलचा भाऊ मुकूल देव यानेही वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

राहुल देव हे टीव्ही व चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव आहे. हिंदीशिवाय बंगाली, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केले आहे. २००० मध्ये चॅप्पियन या चित्रपटापासून त्याने आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर अशोका, दस, इंडियन, क्योंकि, ओंकारा, ढिशूम, मुबारकां अशा अनेक चित्रपटात तो झळकला. ‘बिग बॉस 10’मध्येही स्पर्धक म्हणून तो दिसला. याशिवाय देवों का देव महादेव, दिल बोले ओबेरॉय, सीआयडी या मालिकांमध्येही त्याने भूमिका केल्यात.

Web Title: rahul dev father died actor shared heartfelt post on social media